‘700 धावा काढणार…’ आधीच ठेवले होते लिहून; फोनमधील ती नोट ते मैदानावरील तुफान, वैभव सूर्यवंशीने केला खुलासा

आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सच्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने तब्बल ७७६ धावा कुटत ऑरेंज कॅप जिंकली असून त्याच्या मोबाईलमधील एका नोटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

Published On: 

Vaibhav Suryavanshi IPL 2026 records and orange cap celebration

वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी एखाद्या खेळाडूने आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेत ७०० हून अधिक धावा कुटल्या, तर तुम्ही त्याला काय म्हणाल? राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) यंदाच्या आयपीएलमध्ये असाच काहीसा चमत्कार करून क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

यंदाचा आयपीएल २०२६ चा हंगाम या बिहारच्या पठ्ठ्याने एकट्याच्या जीवावर गाजवला. पण तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की, या ऐतिहासिक कामगिरीची स्क्रिप्ट त्याने स्पर्धा सुरू होण्याआधीच आपल्या मोबाईलमध्ये लिहून ठेवली होती. त्याने स्वतः ‘जिओ हॉटस्टार’शी बोलताना याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Vaibhav Suryavanshi IPL 2026

सामने सुरू होण्यापूर्वीच वैभवने मोबाईलच्या ‘नोट्स’ ॲपमध्ये यंदा ७०० धावांचा टप्पा ओलांडायचा, हे लक्ष्य स्वतःसाठी सेट करून ठेवलं होतं. प्रत्येक सामन्यानंतर तो हा फोन उघडून आपला स्कोअर तपासायचा आणि लक्ष्याच्या किती जवळ पोहोचलो, याचा अंदाज घ्यायचा.

दुसरीकडे, या प्रचंड जिद्दीच्या जोरावर त्याने केवळ उद्दिष्टच पूर्ण केलं नाही, तर तब्बल ७७६ धावा ठोकून ऑरेंज कॅपवरही हक्काने स्वतःचं नाव कोरलं. “मला जर मैदानावर दीर्घकाळ टिकायचं असेल, तर सातत्याने अशीच दमदार कामगिरी करावी लागेल,” असं तो अत्यंत स्पष्टपणे म्हणाला.

त्याचा यावेळचा स्ट्राईक रेट चक्क २३७.३० इतका भयानक होता. भल्याभल्या गोलंदाजांवर त्याने अक्षरशः हल्लाबोल केला आणि संपूर्ण स्पर्धेत तब्बल ७२ उत्तुंग षटकार मारले.

त्यामुळेच, एकाच हंगामात त्याने मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, इमर्जिंग प्लेअर, सुपर स्ट्राईकर, ऑरेंज कॅप आणि सुपर सिक्सेज अशा तब्बल ५ मोठ्या पुरस्कारांवर मोहोर उमटवली. साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांचे विक्रम मोडत आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी वयात ऑरेंज कॅप जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही