Share

अंकिता वालावलकरचा ‘कॉकरोच जनता पार्टी’ला थेट नकार? सीजेपीच्या ट्रेंडवर कोकण हार्टेड गर्लचा मोठा गौप्यस्फोट

‘कॉकरोच जनता पार्टी’ या व्यंगात्मक डिजिटल चळवळीवर अंकिता वालावलकरने भाष्य केलं असून, आंधळेपणाने ट्रेंड फॉलो करण्यापेक्षा स्वतःचा आवाज वापरण्याचा सल्ला दिला आहे.

Published On: 

Ankita Walawalkar On Cockroach Janata Party commenting on the new social media trend

🕒 1 min read

बिग बॉस मराठीच्या घरात आपल्या स्पष्टवक्तेपणाने सर्वांची मनं जिंकणारी अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) आता एका नव्या डिजिटल चळवळीवर थेट भिडली आहे, हे तुम्हाला माहितीये का?

देशात सध्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या व्यंगात्मक डिजिटल चळवळीची जोरदार चर्चा सुरू आहे. बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था आणि NEET पेपर लीक प्रकरणावरून थेट शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत या चळवळीने तरुणाईला अक्षरशः वेड लावलंय.

Ankita Walawalkar On Cockroach Janata Party

पण आता याच बहुचर्चित सीजेपी ट्रेंडवर (Cockroach Janata Party) ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरने आपली रोखठोक भूमिका मांडत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या एका मुलाखतीत अंकिताने या संपूर्ण मुद्यावर अत्यंत बेधडक उत्तर दिलं.

“माझ्याकडे माझा स्वतःचा आवाज आणि प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे सिस्टीमच्या विरोधात लढण्यासाठी मला अशा कोणत्याही वेगळ्या पार्टीत सहभागी होण्याची अजिबात गरज वाटत नाही,” अशी स्पष्ट भूमिका तिने घेतली. त्यामुळेच अंकिता या नव्या ट्रेंडपासून जाणीवपूर्वक दूर असल्याचं स्पष्ट झालंय.

दुसरीकडे, सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके ६ जून रोजी भारतात परतणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांनी सुरू केलेल्या ऑनलाइन याचिकेला आतापर्यंत ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा पाठिंबा मिळाल्याचा दावा केला जातोय.

पण या वाढत्या ट्रेंडवर बोलताना अंकिताने तरुणांना सदसदविवेकबुद्धी वापरण्याचा मोलाचा सल्ला दिलाय. “डोळे झाकून कोणताही ट्रेंड फॉलो करणं योग्य नाही. यामागे नक्की काय राजकारण आहे, हे आपल्याला माहीत नसतं,” असा चिमटाही तिने काढला.

पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा दाखला देत अंकिताने आपली बाजू अधिक स्पष्ट केली. “पुण्याच्या केसमध्येही मी थेट सरकारला जाब विचारत कायद्याची मागणी केली होती. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपण स्वतःच उभं राहिलं पाहिजे,” असं ती ठामपणे म्हणाली. त्यामुळे आता अंकिताच्या या थेट आणि स्पष्ट प्रतिक्रियेवर सीजेपीचे समर्थक काय उत्तर देतात, याकडे संपूर्ण सोशल मीडियाचं लक्ष लागलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!