🕒 1 min read
पुणे- तुमच्या गाडीचा वेग थोडा वाढला किंवा तुम्ही चुकीच्या ठिकाणी गाडी थांबवली तर काय होतं? साहजिकच तुमच्या मोबाईलवर थेट दंडाचा मेसेज धडकतो. पण हाच नियम राज्यातील बड्या नेत्यांना लागू होत नाही का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होतोय.
समृद्धी महामार्गावरील एका व्हिडीओमुळे सध्या चांगलीच खळबळ उडाली आहे. यात अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवे हे दोन बडे नेते चक्क ‘नो स्टॉपिंग’च्या बोर्डाखालीच आपला ताफा थांबवून निवांत गप्पा मारताना दिसत आहेत. माहितीनुसार सत्तार हे उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बोलावण्यावरून मुंबईकडे रवाना झाले होते. उप-मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील सर्व आमदार आणि खासदारांना तातडीने मुंबईत बोलावून घेतले आहे.
दुसरीकडे अंबादास दानवे हे शिर्डीच्या दिशेने निघाले होते. याच प्रवासात दोन्ही नेत्यांच्या गाड्या एकमेकांसमोर आल्या. नेते गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी चक्क भररस्त्यात गळाभेट घेतली.

‘No Stopping’ Board on Samruddhi Mahamarg
समृद्धी महामार्गावर वाहनांचा वेग प्रचंड असतो आणि त्यामुळे तिथे गाड्या थांबवणे अत्यंत धोकादायक मानले जाते. सुरक्षेच्या कारणास्तव तिथे वाहने थांबवण्यास सक्त मनाई आहे. तसा स्पष्ट इशारा देणारा बोर्ड तिथे लावला होता.
पण या सूचनेकडे पूर्णपणे डोळेझाक करत या नेत्यांनी महामार्गावरच (Samruddhi Mahamarg) आपला ताफा थांबवला आणि भेटीगाठी सुरू केल्या. त्यामुळेच आता या प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. जे लोक स्वतः कायदे बनवतात तेच उघडपणे नियम मोडत असतील तर जनतेने कोणाचा आदर्श घ्यायचा, अशी टीका आता होत आहे.
काही दिवसांपूर्वीच या दोन्ही नेत्यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत असं विधान केलं होतं. त्यांच्या या अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
सर्वसामान्यांच्या खिशातून दंड वसूल करणारी यंत्रणा आता या नेत्यांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का? नियम मोडणाऱ्या या नेत्यांना पोलीस दंड लावणार की त्यांना ‘व्हीआयपी ट्रिटमेंट’ म्हणून सोडून देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
Abdul Sattar and Ambadas Danve Caught Chatting Under ‘No Stopping’ Sign!
📌 महत्वाच्या बातम्या
- रामदास आठवले यांचा मराठा आरक्षणावर मोठा गौप्यस्फोट; जरांगे पाटलांच्या मागणीवर थेट म्हणाले…
- रामदास आठवले यांची अजब मागणी; थेट ‘हातभट्टीची दारू’ अधिकृत करा, कारण ऐकून उडेल झोप!
- अंबादास दानवे यांचा मोठा गौप्यस्फोट; लाडकी बहीण योजनेतून आणखी ५०-६० लाख महिला अपात्र ठरणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












