Share

रामदास आठवले यांची अजब मागणी; थेट ‘हातभट्टीची दारू’ अधिकृत करा, कारण ऐकून उडेल झोप!

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मजुरांचे जीव वाचवण्यासाठी आणि महसूल वाढीसाठी हातभट्टीची दारू कायदेशीर करण्याची धक्कादायक मागणी केली आहे.

Published On: 

Hooch Legalization Ramdas Athawale speaking to media about country liquor

🕒 1 min read

भिवंडी– विषारी दारूने एका बाजूला लोकांचे बळी जात असताना, देशाच्या एका जबाबदार केंद्रीय मंत्र्याने थेट ‘हातभट्टी’ची दारू कायदेशीर करण्याची मागणी केली तर तुमचा विश्वास बसेल का? ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सोमवारी भिवंडीत बोलताना ही धक्कादायक मागणी केल्याने, सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पुण्यात नुकतीच बनावट आणि विषारी दारू प्यायल्याने तब्बल २२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेवरून राज्यात आधीच राजकारण तापलं आहे. विरोधकांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल सुरू केला असतानाच, आठवलेंनी एक वेगळाच तर्क मांडून सर्वांना बुचकळ्यात टाकलं आहे.

Ramdas Athawale demands Hooch Legalization

भिवंडी दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी थेट हातभट्टीच्या समर्थनार्थ बॅटिंग केली. त्यांच्या मते, हातावर पोट असणारा आणि दिवसभर राबणारा मजूर वर्ग प्रामुख्याने स्वस्त दारू पितो. महागडी दारू त्यांना कधीच परवडत नाही.

“माझं वैयक्तिक मत असं आहे की, सरकारने हातभट्टीची दारू सरसकट अधिकृत करावी. यामुळे ही दारू सर्वसामान्य मजुरांना परवडणाऱ्या दरात अधिकृतपणे मिळू शकेल,” असं आठवले अगदी स्पष्टपणे म्हणाले. यामागे त्यांनी एक खास लॉजिकही लावलं आहे. जर सरकारने हातभट्टी अधिकृत केली, तर उत्पादन प्रक्रियेवर थेट शासनाचे कायदेशीर नियंत्रण राहील. यामुळे बनावट आणि विषारी दारूमुळे होणारे मृत्यू कायमचे टळतील, असा त्यांचा थेट दावा आहे.

दुसरीकडे, हातभट्टी अधिकृत केल्यास छुप्या मार्गाने होणारी विक्री थांबेल, सरकारलाही मोठा महसूल मिळेल आणि गोरगरीब मजुरांचे जीवही वाचतील, असा तर्क त्यांनी मांडला. मात्र, हे सरकारचं अधिकृत धोरण नसून केवळ आपलं वैयक्तिक मत असल्याचं स्पष्ट करायला ते अजिबात विसरले नाहीत. त्यांच्या या वक्तव्यावर आता राज्यभरातून काय प्रतिक्रिया येतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!