Share

रावसाहेब दानवे यांचं सूचक हसू अन् गौप्यस्फोट; राजेश टोपे खरंच कमळ हाती घेणार?

राजेश टोपेंच्या संभाव्य भाजप प्रवेशावर रावसाहेब दानवे यांनी सूचक मौन बाळगत हसत-हसत दिलेली प्रतिक्रिया सध्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे.

Published On: 

Raosaheb Danve harsh Comment on Abdul Sattar

🕒 1 min read

मुंबई – शरद पवार गटाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणखी एक मोठा धक्का बसणार का? माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे कमळ हाती घेणार, या एका चर्चेने सध्या महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून टोपेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलंय. या सगळ्या घडामोडींवर भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांना छेडलं असता, त्यांच्या एका हसूने आणि सूचक मौनाने मोठी खळबळ उडाली आहे. दानवेंची ही देहबोलीच बरंच काही सांगून जात असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Rajesh Tope BJP Entry rumors

पत्रकारांनी दानवे यांना टोपेंच्या संभाव्य प्रवेशावर थेट प्रश्न विचारला. तेव्हा ते अत्यंत मिश्किलपणे हसले. “मी सध्या यावर काहीच बोलणार नाही, तुम्ही थेट राजेश टोपेंनाच जाऊन विचारा. पण जर ते आले, तर पक्षासाठी ती नक्कीच चांगली गोष्ट आहे,” असं म्हणत दानवे यांनी एका प्रकारे या चर्चांना हवाच दिली. त्यामुळेच आता पडद्यामागे नेमकं काय शिजतंय, याची उत्सुकता वाढली आहे.

पुढे बोलताना दानवेंनी स्पष्ट केलं की, पक्षात येणाऱ्या कोणालाही भाजप आधीच पदाचं आश्वासन देत नाही. दुसरीकडे, ज्यांचं मूळ नेतृत्व कमकुवत झालंय त्यांच्यासाठी भाजपशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही. त्यामुळे जे कोणी पक्षात येऊ इच्छितात त्या बिचाऱ्यांचं भविष्य उज्ज्वल असल्याचा टोमणाही त्यांनी शरद पवार गटाला मारला. “माझ्या बोलण्याने कोणी येईल किंवा थांबेल असं अजिबात नाही,” असंही दानवे हसत-हसत म्हणाले.

याचवेळी अब्दुल सत्तार यांच्या एका विधानाचा संदर्भ देत दानवे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. “भाजप हा एक अथांग समुद्र आहे, ज्यात अनेक नद्या येऊन मिळतात. नवीन आलेल्यांना संधी दिली तरच बाहेर असणाऱ्यांना आशा वाटते. प्राजक्त तनपुरे यांना आम्ही संधी दिली, ते जयंत पाटलांचे भाचे आहेत. त्यामुळे आता जयंत पाटलांनाही वाटू शकतं की भाजपमध्ये गेल्यावर काहीतरी नक्की मिळतं. मग आपणही विचार करायला काय हरकत आहे?” असा थेट सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!