Share

सत्तारांची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर घेतला मोठा निर्णय; आता पुढे काय?

विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणारे समीर सत्तार उद्या माघार घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अब्दुल सत्तारांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.

Published On: 

Maharashtra Politics Controversy, Abdul Sattar, Atul Save

मुंबई – विधानपरिषद निवडणुकीत भाजपविरोधात शड्डू ठोकणारे शिवसेना नेते अब्दुल सत्तार आता अचानक बॅकफूटवर का गेले, हा प्रश्न संपूर्ण जिल्ह्याला पडला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने दावा केलेल्या जागेवर सत्तारांचे चिरंजीव समीर यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने महायुतीत मोठी खळबळ उडाली होती. मात्र, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर हे बंड आता पूर्णपणे शमले आहे.

मुख्यमंत्र्यांसोबतच्या या बैठकीनंतर सत्तारांचा सूर कमालीचा बदलला आहे. “आज मुख्यमंत्र्यांनी मला वेळ दिला आणि आमच्या जिल्ह्याच्या नेत्यांच्या समस्या अगदी शांतपणे ऐकून घेतल्या,” अशी माहिती सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

त्यामुळेच, पुढचे राजकारण करताना महायुतीचा धर्म दोघांनीही पाळावा, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देणार असल्याचे सत्तारांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्र्यांसोबतही याच मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत कुठेही दगाफटका होणार नाही, अशी ग्वाही आता सत्तार देत आहेत. भविष्यात कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात दोन्ही पक्षांनी समन्वयाने राहावे, यावर या बैठकीत एकमत झाले आहे.

सर्वांचे लक्ष लागून असलेल्या समीर सत्तारांच्या उमेदवारीवरही त्यांनी मोठा खुलासा केला. सकाळी अकरा वाजता समीर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला जाणार आहे. तत्पूर्वी सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यासाठी सकाळी दहा वाजता एक बैठक आयोजित करण्यात आली आहे.

कोणत्याही आश्वासनाशिवाय ही माघार घेतल्याचा दावा सत्तारांनी केला आहे. “खालच्या पातळीवर आम्हाला जो त्रास दिला जात होता, त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. माझी नाराजी दूर करण्याचे ठोस आश्वासन त्यांनी दिले,” असल्याचे सत्तारांनी सांगितले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!