Share

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये एकदाच पैसे गुंतवा अन् दरमहा मिळवा ९,२५० रुपये; काय आहे सरकारची ही भन्नाट योजना?

पैशांची १०० टक्के सुरक्षा आणि फिक्स इन्कम देणाऱ्या पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये (POMIS) गुंतवणूक करून तुम्ही दरमहा ९,२५० रुपये मिळवू शकता.

Published On: 

Post Office Scheme passbook and money investment concept

शेअर बाजारातील चढ-उतार पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकतो का? कष्टाची कमाई कुठे गुंतवावी, जेणेकरून ती सुरक्षित राहील आणि महिन्याला फिक्स इन्कमही मिळेल, हा प्रश्न प्रत्येकालाच सतावतो.

जर तुम्हीही अशाच एखाद्या सुरक्षित पर्यायाच्या शोधात असाल, तर भारत सरकारची ‘पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम’ (POMIS) (Post Office Scheme) तुमच्यासाठी एक उत्तम मार्ग ठरू शकते. यात पैशांच्या सुरक्षेची १०० टक्के गॅरंटी तर असतेच, शिवाय दर महिन्याला एक निश्चित रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते.

Post Office Scheme

या योजनेत सध्या ७.४ टक्के एवढा घसघशीत वार्षिक व्याजदर दिला जात आहे. तुम्ही यात सिंगल आणि जॉइंट अशी दोन्ही प्रकारची खाती उघडू शकता. सिंगल अकाऊंटमध्ये जास्तीत जास्त ९ लाख रुपये गुंतवण्याची मुभा आहे.

दुसरीकडे, जर तुम्ही पत्नी किंवा कुटुंबातील सदस्यासोबत जॉइंट खातं उघडलं, तर ही मर्यादा १५ लाखांपर्यंत जाते. गुंतवणूक एकदाच करायची असते आणि त्यावर दरमहा व्याज मिळतं.

सोशल मीडिया आणि इंटरनेटवर अनेकदा दावा केला जातो की, या योजनेतून दरमहा १० हजार रुपये मिळतात. पण, अधिकृत आकडेमोड समजून घेणं गरजेचं आहे.

जर तुम्ही जॉइंट खात्यात १५ लाख रुपये गुंतवले, तर ७.४ टक्के व्याजदराने वर्षाला १ लाख ११ हजार रुपये व्याज मिळतं. म्हणजेच, दर महिन्याला तुमच्या खात्यात ९,२५० रुपये जमा होतात. त्यामुळे १० हजारांचे दावे तूर्तास तरी चुकीचे आहेत.

अर्थात, या योजनेचे काही कडक नियमही आहेत. एकदा खाते उघडले की, एका वर्षाच्या आत ते बंद करता येत नाही. जर तुम्हाला पैशांची अडचण आली आणि तीन वर्षांच्या आत खाते बंद करावे लागले, तर मूळ रकमेतून २ टक्के रक्कम कापून उर्वरित पैसे परत दिले जातात.

त्यामुळेच, जर तुम्हाला कोणतीही जोखीम न घेता दरमहा फिक्स इन्कम हवं असेल, तर मुदत संपेपर्यंत ही गुंतवणूक कायम ठेवणं जास्त फायद्याचं ठरतं. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक उद्दिष्टांचा आणि चालू व्याजदराचा आढावा नक्की घ्या.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही