Share

तब्बल १५ वर्षांचा संसार मोडला; आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाची एकूण संपत्ती किती?

१५ वर्षांच्या संसारानंतर आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर विभक्त झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार आदिनाथची संपत्ती २६ कोटी, तर उर्मिलाची संपत्ती १५-२० कोटी आहे.

Published On: 

Adinath Kothare Urmila Kanetkar Net Worth and divorce official announcement copy

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात परफेक्ट समजली जाणारी जोडी अखेर अधिकृतपणे वेगळी झाली, यावर तुमचा विश्वास बसेल का? गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांवर शिक्कामोर्तब करत अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आणि उर्मिला कानेटकर (Urmila Kanetkar) यांनी आपला १५ वर्षांचा संसार संपवला आहे.

आदिनाथने स्वतः आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक भावूक पोस्ट शेअर करत ही धक्कादायक माहिती दिलीय. गेल्या काही काळापासून त्यांच्या वैवाहिक आयुष्यात मोठे चढ-उतार सुरू होते. या दोघांच्या घटस्फोटाच्या बातमीने सध्या मराठी मनोरंजन विश्वात प्रचंड खळबळ उडाली असून दोघांची एकूण संपत्ती किती, याची चर्चा रंगली आहे.

Adinath Kothare and Urmila Kanetkar Net Worth

चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या दोन्ही कलाकारांची कमाई थक्क करणारी आहे. ‘एशियानेट न्यूज’च्या एका रिपोर्टनुसार, राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आणि निर्माता आदिनाथ कोठारेची एकूण संपत्ती (Net Worth) जवळपास २६ कोटी रुपयांच्या आसपास आहे.

आदिनाथने बालपणीच्या ‘माझा छकुला’पासून ते थेट ‘८३’, ‘चंद्रमुखी’ आणि ‘पाणी’ यांसारख्या चित्रपटांमधून मोठी कमाई केली आहे. दुसरीकडे, अभिनेत्री आणि प्रख्यात कथक नृत्यांगना उर्मिला कानेटकर देखील मागे नाही. तिने ‘दुनियादारी’, ‘काकण’ या चित्रपटांसह ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय.

याच रिपोर्टनुसार, उर्मिलाची एकूण संपत्ती १५ ते २० कोटी रुपयांच्या घरात आहे. कमाईच्या बाबतीत आदिनाथ सध्या उर्मिलापेक्षा थोडा पुढे असल्याचं मीडिया रिपोर्ट्समधून समोर येतंय.

त्यांच्या नात्यात नेमकं काय बिनसलं, याचं ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, या दोघांना जिजा नावाची एक ८ वर्षांची मुलगी आहे. आदिनाथने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं की, जोडीदार म्हणून आमचा प्रवास थांबला असला, तरी मुलीसाठी आम्ही नेहमी एकत्र राहू. या धक्कादायक निर्णयानंतर चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही