Share

रामदास आठवले यांचा मराठा आरक्षणावर मोठा गौप्यस्फोट; जरांगे पाटलांच्या मागणीवर थेट म्हणाले…

रामदास आठवले यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असला तरी सरसकट ओबीसी दाखले देण्यास विरोध दर्शवत EWS मधून आरक्षण देण्याचा पर्याय सुचवला आहे.

Published On: 

Maratha Reservation Ramdas Athawale speaking on OBC quota and Manoj Jarange

🕒 1 min read

भिवंडी– मराठा आरक्षणाचा तिढा कधी सुटणार की हा गुंता आणखी वाढणार? मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे संपूर्ण राज्यात सध्या राजकारण तापलं असतानाच, आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक मोठं विधान करून खळबळ उडवून दिली आहे.

आरपीआयचा मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) पहिल्या दिवसापासूनच जाहीर पाठिंबा असल्याचं आठवलेंनी स्पष्ट केलं. मात्र, सरसकट सर्वच मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास त्यांनी थेट नकार देत नवी चर्चा सुरू केली आहे. विदर्भातील कुणबी मराठा समाजाला आधीच आरक्षण मिळत आहे. मराठा समाजही पारंपरिकरित्या शेतीच करतो. त्यामुळे ज्यांच्या जुन्या नोंदी कुणबी म्हणून आढळल्या आहेत, त्यांना ओबीसी दाखला नक्की द्यावा, याला आपला विरोध नसल्याचं ते म्हणाले.

Maratha Reservation updates Ramdas Athawale

पण, दुसरीकडे मूळ ओबीसी बांधवांवर कोणताही अन्याय होता कामा नये. सरसकट सर्वांना ओबीसीमध्ये टाकण्याऐवजी, मराठा समाजाचा समावेश १० टक्के ईडब्ल्यूएस (EWS) गटामध्ये करून आरक्षण देता येऊ शकतं, अशी माहिती आणि नवा पर्याय त्यांनी सुचवला आहे.

आगामी जनगणनेनंतरच सर्व समाजाची खरी आणि नेमकी आकडेवारी समोर येईल. मात्र, तोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रलंबित निर्णय लवकर मार्गी लागावा, अशी आमची भूमिका असल्याचं आठवले यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हल्लाबोल होण्याची शक्यता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!