🕒 1 min read
पुणे: महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) गेल्या वर्षभरापासून कोट्यवधी महिलांसाठी आधार ठरत आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार आणि कुटुंबातील एकुलत्या एक अविवाहित महिलेला दरमहा १५०० रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते.
महिलांना रोजगार निर्मितीसाठी चालना देणे, त्यांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे, त्यांना आत्मनिर्भर बनवणे, तसेच महिला आणि त्यांच्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करणे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेमुळे राज्यातील महिला सबलीकरणाला मोठा हातभार लागत आहे.
Ladki Bahin Yojana apply online now
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल आणि तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर त्याची सोपी आणि संपूर्ण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
१. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: सर्वात आधी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अधिकृत वेबसाइट ladkibahin.maharashtra.gov.in वर जा.
२. लॉग इन किंवा नवीन खाते तयार करा: वेबसाइटवर गेल्यानंतर ‘लॉग इन’ या पर्यायावर क्लिक करा. जर तुम्ही यापूर्वीच खाते तयार केले असेल, तर थेट लॉग इन करा. नवीन अर्जदार असाल, तर ‘क्रिएट न्यू अकाउंट’ (Create New Account) या पर्यायावर क्लिक करून आपले नवीन खाते तयार करा.
३. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा: नवीन खाते तयार करताना तुमचा अर्ज भरा आणि ‘साइन अप’ (Sign Up) बटणावर क्लिक करा.
४. लॉग इन करून अर्ज भरा: नोंदणी झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून वेबसाइटवर लॉग इन करा. त्यानंतर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज’ या पर्यायावर क्लिक करा.
५. माहिती आणि कागदपत्रे अपलोड करा: तुमचा आधार क्रमांक अचूक भरा आणि ‘सबमिट’ पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर विचारलेली सर्व माहिती योग्यप्रकारे भरा. आवश्यक असलेली कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा आणि शेवटी ‘सबमिट’ (Submit) बटणावर क्लिक करा.
६.अर्ज क्रमांक जतन करा: अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या मोबाईलवर एक एसएमएस येईल, ज्यात तुमचा अर्ज क्रमांक (Application Number) असेल. हा क्रमांक पुढील संदर्भासाठी जपून ठेवा.
तुमच्या अर्जाची स्थिती कशी तपासाल?
१. वेबसाइटवरून तपासणी: तुम्ही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ( Ladki Bahin Yojana ) योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर तुमच्या मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चाचा वापर करून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर ‘माझे अर्ज’ (My Applications) किंवा ‘अर्जाची स्थिती’ (Application Status) या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकता.
२. महानगरपालिकेच्या वेबसाइटवर: तुमच्या संबंधित महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊनही तुम्ही लाडकी बहीण योजनेची यादी किंवा अर्जाची स्थिती तपासू शकता, अशी माहिती क्लियर टॅक्सने दिली आहे.
३. एसएमएसद्वारे माहिती: तुम्हाला तुमच्या अर्जाच्या स्थितीबद्दल एसएमएसद्वारेही माहिती मिळत राहील.
४. लाभार्थी यादी तपासा: योजनेच्या वेबसाइटवर ‘लाभार्थी यादी’ (Beneficiary List) किंवा ‘निवडलेल्या अर्जदारांची यादी’ (List of Selected Applicants) असा पर्याय उपलब्ध असतो, जिथे तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.
या सोप्या पद्धतींचा वापर करून तुम्ही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करू शकता आणि त्याची स्थितीही तपासू शकता. महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन आत्मनिर्भर होण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- हिंदी सक्ती रद्द! ठाकरेंच्या मोर्चापूर्वीच फडणवीस सरकार झुकलं, राज-उद्धव ठाकरेंना यश
- “ती गेली नसती तर…” – बलात्कार प्रकरणात आमदाराच्या धक्कादायक विधानाने खळबळ!
- “जोपर्यंत बंगला बांधत नाही, तोपर्यंत लग्न नाही!” – अजित पवारांनी सांगितला किस्सा, सभेत हास्यकल्लोळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












