पैठण | किरण काळे पाटील : विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांना वाव मिळावा तसेच पोलिसांच्या कार्यपद्धतीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Paithan MIDC Police) विविध शाळांतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत परिसरातील विविध शाळांमधील तब्बल १५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यामध्ये जिल्हा परिषद शाळा ढोरकिन, जिल्हा परिषद शाळा जायकवाडी, नागनाथ विद्यालय वाहेगाव, भीमाशंकर विद्यालय जैन स्पिनर, तुकाराम हायस्कूल ढाकेफळ, आर्यनंदी पब्लिक स्कूल ढोरकिन आणि जिल्हा परिषद शाळा बालानगर या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्पर्धेतील उत्कृष्ट चित्रांची निवड करून क्रमांक १, २ आणि ३ प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. तसेच पोलिसांकडील रायफल व इतर साहित्याची माहिती देत पोलीस स्टेशनची प्रत्यक्ष पाहणी करून देण्यात आली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पोलिसांविषयीची माहिती जवळून मिळाली असून, त्यांच्या मनातील पोलिसांबाबतची भीती दूर होऊन ‘पोलीस हा जनतेचा मित्र’ हा संदेश पोहोचण्यास मदत झाली.
कार्यक्रमास पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भरत मोरे , उप निरीक्षक दशरथ बुरकुल , उप निरीक्षक कविता जगताप , राहुल मोतमल, कर्तारसिंग सिंघल, दिनेश दाभाडे, कृष्णा उगले, भवर , पंडित, दिलवाले यांच्यासह पोलीस कर्मचारी व शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही पोलीस ठाण्याला दिलेल्या भेटीबद्दल उत्साह व्यक्त केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘धनुष्यबाण गोठवण्याची मागणी दुर्दैवी’; शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा
- मनसेसोबतची युती तोडा, अन्यथा विरोधात बसू; भाजपचा शिवसेनेला इशारा
- ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; भाचीचा संशयास्पद मृत्यू, घरात आढळला मृतदेह
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








