ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; भाचीचा संशयास्पद मृत्यू, घरात आढळला मृतदेह

ममता बॅनर्जींची भाची वृष्टी मुखर्जी यांचा रामपूरहाट येथील घरी मृत्यू झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Published On: 

Mamta Banerjee niece Brishti Mukherjee

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची भाजी बृष्टी मुखर्जी (Brishti Mukherjee) हिने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. रामपूरहाट येथील तिच्या राहत्या घरी ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिने स्वतःचे आयुष्य संपवल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. वृष्टी गेल्या चार-पाच वर्षांपासून मानसिक समस्यांशी झुंज देत होती आणि तिच्यावर उपचारही सुरू होते, असेही समजते.

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याच्या संदर्भात यापूर्वी बृष्टीचे नाव चर्चेत आले होते. ती सरकारी ‘ग्रुप-सी’ (Group-C) पदावर कार्यरत होती. ती ममता बॅनर्जी यांचे मामेभाऊ निहार मुखर्जी यांची कन्या होती. निहार मुखर्जी हे रामपूरहाटमधील तृणमूल-विरोधी गटाचे अध्यक्ष आहेत. हे कुटुंब रामपूरहाटमधील कुसुंबा गावचे रहिवासी असून, बृष्टी तिथेच स्थानिक ‘ग्रुप-सी’ कर्मचारी म्हणून काम करत होती.

Mamta Banerjee niece Brishti Mukherjee

शिक्षक भरती घोटाळ्याच्या तपासादरम्यान केंद्रीय तपास यंत्रणांनी ओएमआर (OMR) शीट्सची छाननी केली होती आणि त्यावेळी बृष्टीच्या निवडीबाबतही संशय व्यक्त केला गेला होता.

कुसुंबा गावातील तिच्या घराच्या वरच्या मजल्यावरील बाल्कनीत बृष्टी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. माहिती मिळताच रामपूरहाट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तिचा मृतदेह रामपूरहाट मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला. तिने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रामपूरहाट पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ती गेल्या चार-पाच वर्षांपासून मानसिक समस्यांचा सामना करत होती असे कुटुंबीयांनी सांगितले असले, तरी पोलिसांनी या घटनेचे नेमके कारण अद्याप निश्चित केलेले नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही