मनसेसोबतची युती तोडा, अन्यथा विरोधात बसू; भाजपचा शिवसेनेला इशारा

KDMC मधील मनसे-भाजप वाद चिघळला असून, युती तोडण्याच्या भाजपच्या मागणीने महायुतीसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

Published On: 

BJP MNS alliance dispute in KDMC

मनसे (MNS) आणि भाजपमधील (BJP) वाढत्या राजकीय वादाचे पडसाद आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील (KDMC) महायुतीच्या सत्तासमीकरणावर उमटताना दिसत आहेत. मनसेसोबतची युती तोडण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. यामुळे महायुतीत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील महायुतीमध्ये मनसेचा समावेश आहे. मात्र, मनसे नेत्यांकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबाबत करण्यात आलेल्या कथित वक्तव्यांवरून भाजपमध्ये नाराजी वाढली आहे.

BJP MNS alliance dispute in KDMC

अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो हटवल्याच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने मनसेसोबत सत्तेत बसण्यास स्पष्ट विरोध दर्शवला आहे. नेत्यांचा अपमान सहन करणार नाही. मनसेसोबत सत्तेत बसणार नाही, अशी भूमिका भाजपकडून घेण्यात आली आहे.

महायुती टिकवायची असेल तर मनसेला तातडीने युतीतून बाहेर काढावे, अशी मागणी भाजपने शिवसेनेकडे केली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना पत्र लिहिले आहे. मनसेसोबतची युती तोडण्याची मागणी या पत्रातून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील गटनेता कार्यालयात भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मनसेसोबतची युती तोडली नाही, तर विरोधी पक्षात बसण्याची भूमिका भाजपकडून घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपच्या या आक्रमक भूमिकेमुळे KDMC मधील महायुतीच्या सत्तासमीकरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मनसेसोबतची युती कायम ठेवायची की भाजपच्या मागणीनुसार मनसेला महायुतीतून बाहेरचा रस्ता दाखवायचा, याचा निर्णय आता शिवसेनेच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोमवारी पुणे दौरा केला आणि यावेळी त्यांनी शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची पाहणी केली. या कॉलेजमध्ये गेल्यावर अमित ठाकरे यांनी कँटिनमध्ये मिळणारे जेवण आणि खेळाडूंना प्रशिक्षक मिळत नसण्यावरून कॉलेजच्या अधीक्षक, मुख्याध्यापकांना जाब विचारला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्रांच्या शेजारीच पंतप्रधान मोदींचे छायाचित्र लावल्याचे एका विद्यार्थ्याने निदर्शनास आणून दिले. त्यानंतर ठाकरे यांनी मोदींचे छायाचित्र काढून टाकण्याच्या सूचना दिल्या. मनसेच्या एका कार्यकर्त्यांने त्वरित ते छायाचित्र काढून टाकले.

या प्रकारामुळे भाजपने राज्यभर मनसेविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला असून, त्याचे पडसाद आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकारणातही उमटताना दिसत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही