‘शासनाने वेळ काढू नये…’; मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ उद्या पैठणमध्ये ‘रास्ता रोको’चा इशारा!

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या पैठणमध्ये अखंड मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलनाचा मोठा इशारा देण्यात आला आहे.

Published On: 

Maratha samaj protesters planning rasta roko in Paithan for Manoj Jarange Patil

पैठण | किरण काळे पाटील : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस उजडला असून, आता राज्यभरातून संतापाची लाट उसळू लागली आहे. जरांगे पाटलांची प्रकृती खालावत चालल्याने मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमध्ये मराठा समाज आक्रमक झालाय. जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil)  उपोषणाला थेट पाठिंबा देण्यासाठी उद्या पैठणमध्ये मोठा ‘रास्ता रोको’ करण्यात येणार आहे. शासनाने आता मराठा आरक्षणावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी रोखठोक मागणी अखंड मराठा समाज, पैठण तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.

सह्याद्री चौकात मराठा समाज एकवटणार; प्रशासनाला दिली पूर्वसूचना

उद्याचा हा रास्ता रोको पैठण-शेवगाव रोडवरील सह्याद्री चौकात होणार आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न आता अधिक काळ प्रलंबित न ठेवता शासनाने समाजाच्या भावनांची त्वरित दखल घ्यावी, असा कडक इशारा आंदोलकांनी दिलाय. या भव्य आंदोलनाची अधिकृत पूर्वसूचना पैठणचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना आधीच देण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाचीही धावपळ उडाली आहे.

या आंदोलनात पैठण तालुक्यातील मराठा समाजबांधवांनी शांतता आणि शिस्त राखून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अखंड मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे उद्या पैठणमध्ये नेमकी काय परिस्थिती असेल? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही