Share

 “ती गेली नसती तर…” – बलात्कार प्रकरणात आमदाराच्या धक्कादायक विधानाने खळबळ!

MLA’s controversial remarks on Kolkata rape case sparks outrage: “Why did she go?”

Published On: 

Law student gang-raped in Kolkata rape case college, TMC student leader arrested

🕒 1 min read

कोलकाता: कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कारामुळे कोलकाता शहर हादरले आहे. आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि महाविद्यालयातील घटनेची आठवण करून देणाऱ्या या ताज्या प्रकरणानंतर, आता तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात ( Kolkata Rape Case ) ठोस पुरावे मिळवले असून, आरोपीच्या फोनमधून गुन्ह्याचा व्हिडिओही हस्तगत करण्यात आला आहे.

बलात्काराच्या या धक्कादायक घटनेनंतर, तृणमूल आमदार मदन मित्रा यांनी केलेल्या विधानामुळे सर्व स्तरातून टीका होत आहे. “ती मुलगी तिकडे गेलीच कशाला? ती गेली नसती तर ही सगळी घटना घडलीच नसती,” असे विधान त्यांनी केले. पुढे बोलताना ते म्हणाले, “कॉलेज बंद असताना मुलींना जर कुणी युनिटमध्ये पद देतो म्हणून बोलवत असेल, तर जाऊ नका. बलात्काराच्या या घटनेने मुलींना हाच संदेश दिला आहे.” त्यांनी पीडितेच्या कृतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “ती मुलगी नाही म्हणाली असती तर घटना घडली नसती. शिवाय तिला जायचंच होतं तर ती एकटी का गेली? तिने तिच्या मित्रांना तरी बरोबर घेऊन जायचं होतं. ज्यांनी बलात्कार केला त्यांनी मुलगी एकटी आहे या संधीचा फायदा घेतला,” असेही म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

MLA’s controversial remarks on Kolkata rape case

कोलकाता येथे एका २४ वर्षीय विधी विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत, कंत्राटी कर्मचारी मोनोजित मिश्रा (३१) आणि दोन विद्यार्थी झैब अहमद (१९) आणि प्रमित मुखर्जी (२०) यांना अटक केली आहे. पीडितेच्या आरोपानुसार, दोन्ही विद्यार्थ्यांनी तिला जबरदस्तीने गार्ड रूममध्ये नेले आणि तेथून पळून जाण्यापासून रोखले, तर मिश्राने तिच्यावर बलात्कार केला.

पीडित विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितले आहे की, लैंगिक अत्याचारादरम्यान आरोपींनी तिचा व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओचा वापर करून तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला. “आम्ही तो व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता का, किंवा तो इतरांबरोबर शेअर केला होता याची पडताळणी करत आहोत,” अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Crime India Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या