🕒 1 min read
लोणावळा : कोळी समाजाचं कुलदैवत असलेल्या आई एकविरा देवीच्या मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. येत्या ७ जुलैपासून याची कडक अंमलबजावणी केली जाणार असून, तोकडे किंवा अंगप्रदर्शन करणारे कपडे परिधान केलेल्या भाविकांना प्रवेश नाकारला जाईल, अशी स्पष्ट सूचना संस्थानकडून करण्यात आली आहे.
ड्रेस कोड सर्व भाविकांसह स्थानिक दुकानदारांनाही बंधनकारक असणार आहे. मंदिराचं पावित्र्य टिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थानने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
Ekvira Devi temple bans short clothes
महिलांसाठी – साडी, सलवार-कुर्ता किंवा इतर पारंपरिक भारतीय पोशाख. अंग झाकलेलं असावं.
पुरुषांसाठी – धोतर-कुर्ता, पायजमा-कुर्ता, पॅन्ट-शर्ट किंवा टी-शर्ट. कोणताही अंगप्रदर्शन करणारा पोशाख निषिद्ध.
हे कपडे घालू नयेत- हाफ पॅन्ट्स, फाटलेली जीन्स, शॉर्ट स्कर्ट, मिनी स्कर्ट, वेस्टर्न टॉप्स, स्लीवलेस, डीप नेक कपडे
यापैकी कोणतेही कपडे परिधान करून आल्यास, मंदिरात प्रवेश नाकारण्यात येईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी: ३ भाविकांचा मृत्यू, ५० हून अधिक जखमी; प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह
- धक्कादायक! १६ अब्ज ऑनलाइन पासवर्ड्स लीक; अॅपल, गुगल, फेसबुकसह अनेक प्लॅटफॉर्म धोक्यात
- हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची आज होळी, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटासह विरोधी पक्ष आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





