Share

“भाजपला ‘लुटारूंची टोळी’ म्हणत झोडपलं, अन् त्याचवेळी शरद पवारांचे कौतुक; अजितदादांच्या भाषणानं राजकीय वर्तुळात खळबळ!”

A surprising turn of events in PCMC as DCM Ajit Pawar praises Sharad Pawar’s vision for city development while harshly criticizing BJP.

Published On: 

A surprising turn of events in PCMC as DCM Ajit Pawar praises Sharad Pawar's vision for city development while harshly criticizing BJP.

पिंपरी-चिंचवड: राजकारणात ‘काका-पुतण्या’चा वाद उभ्या महाराष्ट्राने पाहिलाय. अजित पवार ( Ajit Pawar ) माईक हातात घेतला की विरोधकांचा समाचार घेणार, हे फिक्स असतं. पण आज पिंपरी-चिंचवडमध्ये असं काही घडलं, की क्षणभर उपस्थित पत्रकारांसह नेत्यांनाही आपल्या कानांवर विश्वास बसेना. भाजपवर तोफ डागताना अचानक अजितदादांचा सूर बदलला आणि त्यांनी थेट शरद पवारांच्या कामाचं तोंडभरून कौतुक करायला सुरुवात केली.

राष्ट्रवादीची सत्ता होती, तेव्हा PCMC महापालिकेच्या ठेवी ४८४४ कोटी होत्या. आज २००० कोटींवर आणून महापालिकेला कर्जबाजारी केलंय. “एवढा पैसा खर्च केला, तर तो गेला कुठे? रस्ते तर आहेत तिथेच आहेत! सत्ताधाऱ्यांनी कुत्र्यांच्या नसबंदीतही पैसे खाल्लेत! भाजपची राक्षसी भूक मला पाहवत नाही. भाजपला सत्तेची मस्ती, माज आणि नशा आलीये”, अशा शब्दांत अजितदादांनी संताप व्यक्त केला.

Ajit Pawar praises Sharad Pawar’s vision

पत्रकार परिषदेत १९९२ च्या आठवणींना उजाळा देताना अजित पवार थोडे भावूक झाल्याचे दिसले. “आज हे शहर जे काही उभं आहे, त्यात शरद पवारांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनीच विकासाला गती दिली,” असं म्हणत अजितदादांनी साहेबांच्या कामाचा गौरव केला. १९९२ पासून मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी पवारांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा कायापालट केला, हे सांगताना त्यांच्या ( Ajit Pawar ) आवाजातला अभिमान लपत नव्हता.

होय, तुम्ही बरोबर वाचलंत! ज्या भाजपसोबत ते सत्तेत आहेत, त्यांच्या ‘राक्षसी भुके’चे वाभाडे काढताना, अजित पवारांनी पिंपरीच्या विकासाचं सगळं श्रेय शरद पवारांच्या दूरदृष्टीला दिलं.

भाजपच्या मांडीला मांडी, तरीही शरद पवारांचे कौतुक?

पण, राजकारणात काहीही ‘सहज’ नसतं. एकीकडे भाजपवर “लुटारूंची टोळी” म्हणून हल्लाबोल करायचा आणि त्याच वेळी शरद पवारांचे कौतुक करायचे, यामागे अजितदादांची नक्की काय स्ट्रॅटेजी आहे? हे कोडं अनेकांना पडलंय. २०१७ च्या मोदी लाटेत अनेकजण सोडून गेले, पण आम्ही काम करत राहिलो, असं सांगताना त्यांनी अप्रत्यक्षपणे जुन्या दिवसांची आठवण करून दिली.

आता या ‘कौतुक सोहळ्या’मुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. ही घरवापसीची चाहूल आहे की निव्वळ वस्तुस्थिती? हे येणारा काळच सांगेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही