Share

“हा तर फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी!” लक्ष्मण हाकेंनी फोडला बॉम्ब; ‘या’ ४ बड्या नेत्यांची नावं घेत थेट चॅलेंज!

Laxman Hake warns Bajrang Sonwane and Rajesh Tope over the Pooja More issue, while Jarange slams trolls.

Published On: 

ओबीसी नेते Laxman Hake यांना जीवे मारण्याची धमकी; व्हिडीओ शेअर करत म्हणाले...

🕒 1 min read

विशेष प्रतिनिधी | बीड

निवडणूक लढण्याआधीच माघार घेणं सोपं असतं का? पण बीडमध्ये पूजा मोरेंच्या माघारीने जे वादळ उठलंय, त्याने भल्याभल्यांची झोप उडवली आहे. ही फक्त एक राजकीय माघार नाही, तर बीडच्या राजकारणातली मोठी ठिणगी ठरली आहे! या एका घटनेने पुन्हा एकदा लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे पाटील आमने-सामने आले आहेत.

लक्ष्मण हाकेंच्या त्या वक्तव्याने, ज्याने सध्या सोशल मीडियावर धुरळा उडवून दिलाय. हाके नुसते बोलले नाहीत, तर त्यांनी थेट तोफेची तोंडेच उघडली आहेत. त्यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिलात का? त्यात ते स्पष्ट शब्दांत विरोधकांना ठणकावून सांगतायत, “पूजा मोरे हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है!”

Laxman Hake vs Manoj Jarange: Pooja More Controversy

पण थांबा, हा इशारा कोणा कार्यकर्त्याला नाही, तर थेट बीडच्या दिग्गजांना आहे. खासदार बजरंग सोनवणे, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके आणि राजेश टोपे… या बड्या नेत्यांना हाकेंनी टार्गेट केलंय. “तुम्ही ओबीसी नेत्यांना आणि समाजाला सोडलं नाही, आता त्याचे परिणाम भोगावेच लागतील,” असा आक्रमक पवित्रा हाकेंनी घेतला आहे. लढण्याआधीच रणांगणातून पळ काढणं हे ‘पाप’ असल्याचं म्हणत त्यांनी मोरेंच्या माघारीवरही बोट ठेवलंय.

इतकेच नाही तर… आता या आगीत तेल ओतायला दुसरी बाजूही तयार आहे. मराठा आरक्षणाचा बुलंद आवाज, मनोज जरांगे पाटील यांनी नाशिकमधून थेट एंट्री घेतली आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाला ‘संस्कृतीचा’ आरसा दाखवला. “निवडणुकीच्या तोंडावर जुने व्हिडीओ उकरून काढून एखाद्याला टार्गेट करणं, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही,” अशा शब्दांत जरांगेंनी ट्रोलर्सला सज्जड दम भरलाय. “अन्यायाविरुद्ध आम्ही नेहमीच उभे राहू,” असं म्हणत त्यांनी विरोधकांना प्रति-आव्हान दिलं आहे.

आता खरी गंमत बघा… एकीकडे हाके म्हणतात “पिक्चर बाकी आहे”, तर दुसरीकडे जरांगे म्हणतात “खबरदार!”. त्यामुळे पूजा मोरे प्रकरणावरून बीडच्या रणांगणात आता पुढचा वार कुणाचा असेल? आणि या ‘ट्रेलर’चा क्लायमॅक्स काय असेल? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या