Share

पुढचा जेम्स बाँड कोण? कॅलम टर्नरचं नाव आघाडीवर; ॲरॉन टेलर-जॉन्सन शर्यतीतून बाहेर?

British actor Callum Turner overtakes favorites to become the top contender for the next James Bond role.

Published On: 

British actor Callum Turner overtakes favorites to become the top contender for the next James Bond role.

🕒 1 min read

लंडन: हॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘जेम्स बाँड’ (James Bond) या भूमिकेसाठी एका नव्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आतापर्यंत या शर्यतीत आघाडीवर असलेल्या ॲरॉन टेलर-जॉन्सनला मागे टाकत, ३५ वर्षीय ब्रिटीश अभिनेता कॅलम टर्नर (Callum Turner) याने सट्टाबाजारात (Betting Market) पहिलं स्थान पटकावलं आहे. ब्रिटीश मीडिया हाऊस ‘द टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या २४ तासांत कॅलम टर्नरच्या नावारूपाने सट्टाबाजारात मोठी उलथापालथ झाली आहे.

या चर्चेला हवा मिळण्यामागे एक ‘कनेक्शन’ देखील आहे. कॅलम टर्नर नुकताच त्याची मंगेतर आणि जगप्रसिद्ध पॉप स्टार दुआ लिपा (Dua Lipa) हिच्यासोबत जमैका येथील ‘गोल्डनआय’ (GoldenEye) रिसॉर्टवर सुट्टी साजरी करताना दिसला होता. विशेष म्हणजे, हे तेच ठिकाण आहे जिथे जेम्स बाँडचे जनक इयान फ्लेमिंग यांनी त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या लिहिल्या होत्या. बाँडच्या जन्मस्थळी कॅलमची उपस्थिती ही केवळ सुट्टी नसून, त्यामागे काहीतरी शिजतंय, असा अंदाज आता लावला जात आहे.

कॅलम टर्नरने यापूर्वी ‘फॅन्टॅस्टिक बीस्ट्स’ आणि ॲपल टीव्हीच्या ‘मास्टर्स ऑफ द एअर’ या गाजलेल्या सीरिजमध्ये काम केले आहे. मात्र, अधिकृत घोषणा अजून दूर आहे. ‘ड्यून’ फेम दिग्दर्शक डेनिस विलेन्युव्ह (Denis Villeneuve) पुढील बाँड सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत आणि ते एका फ्रेश चेहऱ्याच्या शोधात आहेत. या सिनेमाची निर्मिती आता Amazon MGM Studios कडे असून, चित्रपटाचे शूटिंग २०२७ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सिनेमा पडद्यावर यायला २०२८ उजाडणार आहे, जे चाहत्यांसाठी एक मोठं वेटिंग असणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!