Share

नवीन वर्षाची सुरुवात ‘महागाई’च्या चटक्याने; गॅस सिलिंडर महागला, तर ‘पॅन’ कार्डबद्दल मोठी अपडेट!

नवीन वर्षात पॅन-आधार लिंकिंग, एलपीजी दर आणि कारच्या किंमतीत मोठे बदल. १ जानेवारी २०२६ पासून काय महाग, काय स्वस्त? वाचा सविस्तर बातमी.

Published On: 

तुमचं PAN Card बंद पडलंय का? १ जानेवारीपासून खिसा कापला जाणार; हे नियम वाचले नाहीत तर पस्तावाल!

मुंबई : नवीन वर्ष २०२६ चे स्वागत होत असतानाच सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागली आहे. १ जानेवारीपासून देशात अनेक महत्त्वाचे आर्थिक बदल लागू झाले असून, काही ठिकाणी दिलासा तर काही ठिकाणी दंड भरावा लागणार आहे. एकीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडर महागल्याने हॉटेलमधील जेवण महाग होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे पॅन-आधार लिंक न केलेल्यांना आता मोठा फटका बसणार आहे.

सर्वात मोठा बदल पॅन कार्ड (PAN Card) संदर्भात झाला आहे. ३१ डिसेंबर २०२५ ची डेडलाईन संपल्यामुळे, ज्यांनी अजूनही पॅन आणि आधार लिंक केलेले नाही, त्यांचे पॅन कार्ड १ जानेवारीपासून ‘इनअ‍ॅक्टिव्ह’ (निकामी) झाले आहे. आता पॅन पुन्हा चालू करण्यासाठी १,००० रुपये दंड भरावा लागेल. तोपर्यंत तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार नाही, परतावा (Refund) मिळणार नाही आणि बँकेत व्यवहार करताना २० टक्के दराने टीडीएस (TDS) कापला जाईल, असे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, महागाईचा भडका उडवत ऑईल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (19 Kg) दरात तब्बल १११ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे दिल्लीत कमर्शियल सिलिंडर १६९१.५० रुपयांवर पोहोचला आहे. सुदैवाने, घरगुती गॅसच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यासोबतच, बीएमडब्ल्यू (BMW), मर्सिडीज आणि होंडा सारख्या कंपन्यांनी कारच्या किंमतीत ६ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.

New Financial Rules from 1 Jan 2026

१ एप्रिल २०२६ पासून नवीन आयकर कायदा (Income Tax Act 2025) लागू होणार आहे. तसेच, आरबीआयच्या नवीन नियमांनुसार एप्रिलपासून तुमचा क्रेडिट स्कोअर दर आठवड्याला अपडेट होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ८ वा वेतन आयोग १ जानेवारीपासून लागू होणे अपेक्षित असले, तरी अद्याप त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे पगारवाढीसाठी कर्मचाऱ्यांना २०२६ च्या अखेरपर्यंत वाट पाहावी लागेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही