अजित पवारांचा भाजपला ‘दे धक्का’; “त्या गुंडाला पासपोर्ट कोणी दिला?”, मुरलीधर मोहोळांवर थेट वार!

Ajit Pawar attacks BJP and Murlidhar Mohol over criminal candidates and corruption in Pune municipal elections.

Published On: 

Ajit Pawar vs Murlidhar Mohol Pune BJP | PMC Exit Poll 2026

पुणे – राजकारणात मित्र कोण आणि शत्रू कोण, हे ओळखणं कठीण असतं, याचा प्रत्यय पुन्हा एकदा पुणेकरांना आलाय. राज्यात सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले महायुतीचे नेते पुण्यात मात्र एकमेकांचे कपडे फाडताना दिसत आहेत. निमित्त आहे पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेच्या निवडणुकीचं! उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी भाजपवर केलेल्या एका गंभीर आरोपामुळे सध्या पुण्याचे राजकारण चांगलंच तापलं आहे.

पुण्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांवरून भाजपने राष्ट्रवादीला घेरण्याचा प्रयत्न केला होता. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादीच्या यादीवर टीका करताच, अजितदादांनी आपल्या खास शैलीत ‘हिशोब चुकता’ केला. “एका व्यक्तीला परदेशात जायला कोणी मदत केली? त्याला पासपोर्ट कोणी दिला? तो कसा पळाला?” असे सवाल करत दादांनी थेट मोहोळांच्या दिशेने संशयाची सुई फिरवली आहे. निलेश घायवळ याला विदेशात पळून जाण्यास कोणी मदत केली, याचे हे स्पष्ट संकेत मानले जात आहेत. इतकेच नाही तर, “माझ्यावर ७० हजार कोटींचे आरोप करणारेच आता माझ्या मांडीला मांडी लावून बसलेत,” असा टोला लगावत आरोपांमधील फोलपणाही त्यांनी उघड केला.

Ajit Pawar vs Murlidhar Mohol Pune BJP

भाजपने राष्ट्रवादीच्या ‘आंदेकर’ कुटुंबातील उमेदवारीवर बोट ठेवले होते. मात्र, दुसरीकडे खुद्द भाजपनेच कात्रजमधून कुख्यात गुंड देविदास चोरघेची पत्नी प्रतिभा चोरघेला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ‘दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही’, अशीच काहीशी अवस्था भाजपची झाली आहे.

भाजप नेत्यांची ‘बोलती बंद’?

अजित पवारांनी १९९२ ते २०१७ या काळात पिंपरी-चिंचवडचा आपण कसा कायापालट केला, याचा पाढाच वाचला. ‘विठ्ठल मूर्ती घोटाळा’ झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. पुण्यात आणि पिंपरीत भाजपच्या काळात ‘अर्बन स्ट्रीट’च्या नावाखाली रस्त्यांची वाट लागली आणि टेंडरमध्ये ‘रिंग’ झाली, असे आरोप अजित पवारांनी केले आहेत. “मी पुराव्याशिवाय बोलत नाही,” असा दमही त्यांनी भरला.

विशेष म्हणजे, दादांच्या ( Ajit Pawar ) या तोफखान्यापुढे स्थानिक भाजप नेते मात्र गप्प आहेत. आमदार महेश लांडगे नॉट रिचेबल आहेत, तर शंकर जगतापांनी प्रचाराचे कारण पुढे केले आहे. स्थानिक नेत्यांच्या या मौनामुळे अजित पवारांच्या आरोपांमध्ये तथ्य आहे का? असा प्रश्न आता पुणेकर विचारू लागले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही