Share

“ज्यांनी ७० हजार कोटींचे आरोप केले, त्यांच्याच मांडीला मांडी…”; अजितदादांचा भरसभेत ‘सेल्फ गोल’ की टोला?

“I am sitting in power with the very people who accused me of the 70,000 crore scam,” admits Ajit Pawar in a candid public statement.

Published On: 

DCM Ajit Pawar slams BJP over massive corruption in PCMC, alleging funds misuse in everything from road tenders to dog sterilization. | Devendra Fadnavis

🕒 1 min read

पुणे/मुंबई: राजकारणात लाजाळूचं झाड नसतं, हे आपल्याला माहितच आहे. पण कधी कधी राजकारणी असं काही सत्य बोलून जातात की ऐकणाऱ्याला प्रश्न पडतो हसावं की रडावं? आज खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी भरसभेत अशी ‘गुगली’ टाकली की, समोर बसलेल्या कार्यकर्त्यांनाही कळलं नाही की टाळ्या वाजवाव्यात की कपाळावर हात मारावा!

अजितदादा म्हणजे स्पष्टवक्तेपणा. मनात एक आणि ओठांवर दुसरं हे त्यांच्या स्वभावात नाही. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी जुन्या आरोपांचा उल्लेख करत भाजपसोबतच्या युतीवर मिश्किल, पण सत्य विधान केलं.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

“माझ्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप झाला. झाला ना? मग ज्यांनी ज्यांनी हे आरोप केले, त्या सगळ्यांच्या सोबत आज मी सरकारमध्ये आहे. आहे ना?”

Ajit Pawar 70000 Crore Scam Statement

बघा, हे वाक्य साधं नाही. यात एकाच वेळी स्वतःच्या परिस्थितीवर केलेली टिपणी आहे आणि ज्या भाजपने हे आरोप केले होते, त्यांना आरसा दाखवण्याचं धाडसही अजितदादा मध्ये आहे. ज्या सिंचन घोटाळ्यावरून एकेकाळी भाजपने रान उठवलं होतं, ‘चक्की पिसिंग’च्या वल्गना झाल्या होत्या, आज त्याच नेत्यांसोबत म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्तेत मांडीला मांडी लावून बसलोय, याची अजितदादांना पुरेपूर जाणीव आहे.

इतकेच नाही तर, हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य होतं. उपस्थितांमध्ये या विधानावर एकच हशा पिकला. पण, या हशामागे राजकारणाचं विदारक सत्य दडलेलं आहे. “राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि तत्त्वांपेक्षा सत्ता महत्त्वाची असते,” हेच जणू अजितदादांनी या एका वाक्यातून पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. आता या विधानाचे दिल्लीपासून गल्लीपर्यंत काय पडसाद उमटतात, हे पाहणं रंजक ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही