🕒 1 min read
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणा आणि मिश्किल स्वभावासाठी ओळखले जातात. पुण्यात ‘सारथी’ संस्थेमार्फत यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलताना त्यांनी आपल्या आयुष्यातील एक खास आणि मजेशीर किस्सा सांगितला, ज्याने सभागृहात एकच हशा पिकला.
यावेळी उपस्थित असलेल्या नवनियुक्त अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी त्यांना जबाबदारीने काम करण्याचा सल्ला दिला. “आता तुम्ही काही कालावधीत अधिकारी पदावर काम करणार आहात. सगळ्यांनी व्यवस्थित आणि जबाबदारीने काम पार पाडा. पण, कधी चुकून आपलं काही चुकलं, तर त्या ठिकाणी मोठी बदनामी आपल्याला सहन करावी लागते. त्या गोष्टी होता कामा नये,” असे त्यांनी बजावले. तसेच, “तुमच्याकडे येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवा. सगळी लोक लांब गावातून तुमच्याकडे येतात, कुणालाही काम न करता परत पाठवू नका,” असा मोलाचा सल्लाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
Ajit Pawar’s Hilarious Marriage Condition
आपल्या भाषणात अजित पवार यांनी एक जुना आठवणीतला किस्सा सांगितला. “मी राजकीय जीवनाला सुरुवात केली होती, त्यावेळेची एक गोष्ट आठवते ती म्हणजे ए. आर. अंतुले साहेबांचे मुख्यमंत्रीपद गेले होते. १९७९-८० चा काळ असेल,” असे ते ( Ajit Pawar ) म्हणाले. त्यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी अजित निंबाळकर होते. सिमेंटचा प्रचंड तुटवडा होता.
“अजित निंबाळकर यांच्या हातामध्ये सिमेंटचे परमिट देण्याचे अधिकार होते, त्यामुळे मी निंबाळकर साहेबांकडे गेलो आणि म्हणालो, काटेवाडीमध्ये घर बांधायला काढले आहे. त्यासाठी सिमेंट पाहिजे,” असे अजित पवारांनी सांगितले. त्यावेळी आपण मनात ठरवले होते की, “जोपर्यंत बंगला बांधत नाही, तोपर्यंत लग्न करायचं नाही. बायकोला पत्र्याच्या घरात आणू काय?” असे अजित पवार म्हणताच, सभागृहात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
पुढे ते म्हणाले, “मला सिमेंटचे परमिट देण्यात आले, त्यावेळी एक सिमेंटचे पोते २७ रुपये ८५ पैशांना होते. मला एक हजार पोती दिली आणि माझे घर बांधून झाले. तसेच, ज्यावेळी मी घराकडे पाहतो, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर अजित निंबाळकर येत असतात,” असे ( Ajit Pawar ) म्हणताच पुन्हा उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला.
📌 महत्वाच्या बातम्या
- लोणावळ्याच्या आई एकविरा मंदिरात ७ जुलैपासून ड्रेस कोड; ‘तोकड्या’ कपड्यांना प्रवेश नाही
- पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी: ३ भाविकांचा मृत्यू, ५० हून अधिक जखमी; प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह
- धक्कादायक! १६ अब्ज ऑनलाइन पासवर्ड्स लीक; अॅपल, गुगल, फेसबुकसह अनेक प्लॅटफॉर्म धोक्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








