सुनील तटकरेंचा थेट संताप, भुजबळांशी जुंपली अन् राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठा गदारोळ!

देवगिरी बंगल्यावरील राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनील तटकरे यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. यावेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या छगन भुजबळांसोबत त्यांची खडाजंगी झाली.

Published On: 

NCP Internal Rift: Sunil Tatkare and Chhagan Bhujbal dispute in NCP meeting.

मुंबई – अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय? बाहेरून सगळं शांत वाटत असलं तरी आत धुसफूस सुरू आहे, हे आता लपून राहिलेलं नाही. मंगळवारी देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत जो राडा झाला, त्याने राजकारण चांगलंच तापलं आहे.

मुंबईतील या महत्त्वाच्या बैठकीकडे प्रफुल पटेल यांनी चक्क पाठ फिरवली. पण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र बैठकीत हजेरी लावत मनात साचलेला सगळा राग थेट सुनेत्रा पवारांसमोर बाहेर काढला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

NCP Internal Rift: तटकरेंचा संताप अनावर, भुजबळांनी रोखण्याचा केला प्रयत्न

तटकरे यांनी थेट पक्षनेतृत्वालाच जाब विचारला. अजित पवारांच्या निधनानंतर पक्ष सुनेत्रा पवारांच्या हाती सोपवण्यात आणि तो एकसंध ठेवण्यात आपली आणि पटेल यांची मोठी भूमिका होती, याची त्यांनी आवर्जून आठवण करून दिली.

पण दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून जेव्हा आमच्यावर चहुबाजूंनी हल्लाबोल झाला, तेव्हा पक्षाचा एकही नेता आमच्या बचावासाठी पुढे आला नाही, अशी तीव्र खंत त्यांनी बोलून दाखवली. केवळ आम्ही दोघांनीच टीकेचे धनी का व्हायचे? वरिष्ठ नेतृत्व काही बोलणार आहे की नाही? असा थेट सवाल करत त्यांनी खळबळ उडवून दिली.

तटकरेंचा हा आक्रमक पवित्रा पाहून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ त्यांना शांत करण्यासाठी पुढे आले. “जे झालं ते झालं, आता जुने विषय उकरून काढण्यापेक्षा पुढे जाण्याची गरज आहे,” असा सल्ला भुजबळांनी दिला. पण तटकरे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

“मी यावर बोलणारच आणि आज याचा सोक्षमोक्ष लागायलाच हवा,” असं त्यांनी भुजबळांना ठणकावून सांगितलं. यामुळे बैठकीत चांगलाच तणाव निर्माण झाला. धक्कादायक माहिती म्हणजे, तटकरे बोलण्यासाठी उभे राहण्यापूर्वीच पार्थ पवार तडकाफडकी बैठकीतून निघून गेले होते.

तटकरेंनी आपली रोखठोक भूमिका मांडल्यानंतर एकाही आमदाराने पुढे काहीही बोलण्याचं धाडस दाखवलं नाही. त्यानंतर एकदम स्तब्धतेतच ही वादळी बैठक संपल्याची चर्चा आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही