राष्ट्रवादीत खडाजंगी, पण रात्री उशिरा छगन भुजबळ भाजप नेत्यासोबत काय करत होते?

राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे आणि भुजबळ यांच्यात खडाजंगी झाल्याची चर्चा आहे. मात्र, रात्री उशिरा भुजबळ आपल्यासोबत होते, असा गौप्यस्फोट बावनकुळे यांनी केला आहे.

Published On: 

NCP Crisis Chhagan Bhujbal meeting Chandrashekhar Bawankule late night

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या आत नेमकं काय शिजतंय? पक्षाच्या बैठकीत दोन बड्या नेत्यांमध्ये जुंपल्याची चर्चा ताजी असतानाच, रात्री उशिरा छगन भुजबळ चक्क भाजपच्या एका मोठ्या नेत्यासोबत होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सध्या राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली आहे. प्रफुल पटेल बैठकीला गैरहजर होते. तर सुनील तटकरे यांनी आक्रमक होत आपली व्यथा मांडली. पक्षावर हल्ले होत असताना कुणीही आमच्या बाजूने बोलत नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

NCP internal clash and Chhagan Bhujbal meeting BJP 

याच मुद्द्यावरून तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी झाल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजते. मात्र, आपण फक्त त्यांना आवरतं घ्यायला सांगितले, असा बचाव भुजबळांनी केला.

दुसरीकडे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तटकरे आणि भुजबळ यांच्यात वाद झाल्याचे मला वाटत नाही, कारण काल रात्री उशिरापर्यंत भुजबळ माझ्यासोबतच होते, असे बावनकुळे म्हणाले. त्यामुळेच राजकारण चांगलंच तापलं आहे.

राज्यातील ओबीसी प्रश्नांवरही बावनकुळे यांनी भाष्य केले. त्यांच्या नेतृत्वात नुकतीच ओबीसी मंत्र्यांची बैठक पार पडली. मराठा आणि ओबीसी हे दोन समाज समोरासमोर येणार नाहीत. तसेच कुणाच्याही ताटातले दुसऱ्याला देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विधानपरिषद निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन त्यांनी काँग्रेसला केले आहे. भाजप आणि मित्रपक्षांचे पारडे जड आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत निवडणूक लादून पैशांचा अपव्यय करू नये, असे ते म्हणाले. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा ९९ टक्के पूर्ण झाली असून उद्यापर्यंत अधिकृत घोषणा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर बावनकुळे यांनी जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केल्यास भाजप कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाहीत, असा सज्जड दम बावनकुळे यांनी दिला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही