Share

कोणत्याही परिस्थितीत कुर्बानीला परवानगी देऊ नका; भाजप नेत्यांचा बीएमसीला थेट इशारा, नेमकं कारण काय?

गोरेगावमध्ये उघड्यावर कुर्बानी देण्यास भाजप नगरसेविका प्रिती साटम यांनी तीव्र विरोध केला आहे. तर भाजपच्या ७ आमदारांनीही सोसायट्यांमधील कुर्बानीवर बंदीची मागणी केलीय.

Published On: 

Bakri Eid Qurbani Mumbai: भाजपचा कुर्बानीला तीव्र विरोध!

सणासुदीचे दिवस आले की मुंबईत राजकारण तापणार नाही, असं क्वचितच घडतं. मीरा रोडमध्ये बकऱ्याच्या कुर्बानीवरून (Bakri Eid Qurbani) झालेला राडा आणि हाणामारीची घटना ताजी असतानाच, आता मुंबईत पुन्हा एकदा नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आगामी बकरी ईदच्या (Bakri Eid Qurbani) पार्श्वभूमीवर गोरेगावमध्ये मोठा वाद उभा राहण्याची चिन्हं आहेत. प्रभाग क्रमांक ५२ च्या भाजप नगरसेविका प्रिती साटम यांनी गोकुळधाम परिसरातील उघड्यावर होणाऱ्या कुर्बानीला आक्रमक विरोध दर्शवला आहे. याबाबत त्यांनी पी (दक्षिण) विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना थेट लेखी पत्र देऊन कडक भूमिका घेतली आहे.

Bakri Eid Qurbani Mumbai

गोरेगाव पूर्वेकडच्या सॅटेलाईट गार्डन फेज-२ मधील आझाद नगर डी-३ इमारतीच्या आवारात कोणत्याही परिस्थितीत कुर्बानीला परवानगी देऊ नये, अशी त्यांची ठाम मागणी आहे.

“उघड्यावर कुर्बानी दिल्यास मोठी अस्वच्छता आणि रोगराई पसरेल. शिवाय, स्थानिक नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असा दावा साटम यांनी या पत्रात केलाय.

महापालिकेच्या नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी असे प्रकार करताना परिसरातील संवेदनशीलता जपणं गरजेचं असतं. या भागात शाळा आणि धार्मिक स्थळं असल्याने लहान मुलांच्या मानसिकतेवर आणि सामाजिक सलोख्यावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केलीय.

सूत्रांनुसार, गेल्या वर्षीही नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने इथली परवानगी रद्द केली होती. आता हे प्रकरण फक्त एका वॉर्डपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. भाजपच्या तब्बल ७ आमदारांनी थेट मुंबई महापालिका आयुक्तांनाच पत्र लिहिलंय.

आमदार पराग शाह, मनीषा चौधरी, अतुल भातखळकर यांच्यासह माजी खासदार किरीट सोमय्या आणि मनोज कोटक यांनीही रहिवाशी संकुल, हाऊसिंग सोसायटी आणि चाळींमध्ये कुर्बानी देण्यावर सरसकट बंदी घालावी, अशी थेट मागणी केलीय. त्यामुळे आता बीएमसी प्रशासन काय पाऊल उचलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install