Share

रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ने रचले असे ५ रेकॉर्ड्स जे मोडणं कठीण; अवघ्या 25 दिवसांत केली छप्परफाड कमाई

‘राजा शिवाजी’ चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार करत ५ मोठे विक्रम रचले आहेत. सैराटलाही या चित्रपटाने मागे टाकले आहे.

Published On: 

Raja Shivaji Movie: बॉक्स ऑफिसवर ५ ऐतिहासिक रेकॉर्ड्स!

मराठी चित्रपट कधी १०० कोटींचा टप्पा ओलांडेल, असा विचार तुम्ही कधी केला होता का? जे आजवर कुणालाही जमलं नाही, ते आता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) करून दाखवलंय.

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एकाच नावाची चर्चा आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाने (Raja Shivaji Movie) बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातलाय.

Raja Shivaji Movie

रितेशने स्वतः दिग्दर्शित केलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलंय. निर्मात्यांनी नुकत्याच दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या सिनेमाने अवघ्या २४ दिवसांत भारतात १०१.४ कोटींची छप्परफाड कमाई केली आहे.

या घसघशीत आकड्यामुळे चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. या सिनेमाने केवळ कमाईच केली नाही, तर तब्बल ५ असे मोठे रेकॉर्ड्स बनवलेत, जे मोडताना भल्याभल्यांच्या नाकीनऊ येतील.

सगळ्यात मोठा धक्का म्हणजे, या चित्रपटाने ‘सैराट’चा ९० कोटींचा रेकॉर्ड कायमचा मोडीत काढलाय. आता हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा पहिला आणि एकमेव १०० कोटी क्लबमधला मराठी सिनेमा ठरलाय.

केवळ भारतातच नाही, तर जगभरात या चित्रपटाची मोठी हवा आहे. वर्ल्डवाइड कलेक्शनचा विचार केला तर हा आकडा ११४ कोटींच्या पार गेलाय. विशेष म्हणजे, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ११.७ कोटींचा गल्ला जमवत या सिनेमाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. ओपनिंग डेचे हे आकडे मराठी सिनेसृष्टीसाठी ऐतिहासिक आहेत.

या चित्रपटात रितेशसोबत जेनेलिया, संजय दत्त, विद्या बालन, अभिषेक बच्चन यांची मोठी फौज आहे. तर भाईजान सलमान खानच्या कॅमिओने प्रेक्षकांना सुखद धक्का दिलाय. रितेशच्या यशस्वी करिअरमधला हा १० वा १०० कोटींचा चित्रपट ठरलाय. प्रादेशिक भाषेत स्वतः दिग्दर्शन करत त्याने मारलेली ही बाजी खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही