Share

मेरे करण-अर्जुन आ गए…..दिव्यांका त्रिपाठी झाली आई; लग्नाच्या १० वर्षांनंतर घरात दोन चिमुकल्यांची एन्ट्री!

लग्नाच्या १० वर्षांनंतर अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आई झाली आहे. तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला असून विवेक दहियाने सोशल मीडियावर ही बातमी दिली.

Published On: 

Divyanka Tripathi Twins: दिव्यांका झाली आई!

मनोरंजन विश्वातून सध्या एकापाठोपाठ एक आनंदाच्या बातम्या समोर येत आहेत. त्यातच आता टीव्हीवरील घराघरातील लाडकी सून ‘इशिता भल्ला’ अर्थात दिव्यांका त्रिपाठीच्या (Divyanka Tripathi) घरी पाळणा हलला आहे.

वयाच्या ४१ व्या वर्षी दिव्यांकाने एक नव्हे, तर चक्क दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. लग्नाच्या तब्बल १० वर्षांनंतर घरात दोन नव्या पाहुण्यांचे आगमन झाल्याने दिव्यांका आणि विवेक दहिया यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. Divyanka Tripathi Pregnancy ची ही बातमी सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे.

Divyanka Tripathi Twins

विवेक दहियाने इंस्टाग्रामवर एक अतिशय गोड पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही डबल गुड न्यूज दिली. “अखेर प्रतीक्षा संपली… ‘The Boys’ आलेत! मेरे करण-अर्जुन आ गए… आता आम्ही पालकत्वाच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहोत,” अशा भावूक शब्दांत विवेकने आपला आनंद व्यक्त केला आहे.

एका निळ्या रंगाच्या कपड्यातील मुलांचा फोटो शेअर करत त्याने पुढे लिहिलंय की, “आम्ही देवाकडे आनंद मागितला आणि तो म्हणाला ‘दुप्पट घ्या’.” त्यांच्या या घोषणेनंतर चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दिव्यांका आणि विवेकने गरोदरपणाचे सहा महिने उलटल्यानंतरच चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती. नुकतंच तिचं डोहाळेजेवणही मोठ्या थाटामाटात पार पडलं होतं. ८ जुलै २०१६ रोजी भोपाळमध्ये ‘ये है मोहब्बतें’ च्या सेटवर जुळलेली ही रेशीमगाठ आता एका परिपूर्ण कुटुंबात बदलली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install