Share

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवरुन उदय सामंत यांचा संताप; म्हणाले, ‘मी ज्यांना मदत केली त्यांनीच…’

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत हस्तक्षेपाचे आरोप झाल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना थेट खडसावलं आहे. पाटकर आणि भोसलेंच्या आरोप-प्रत्यारोपांनीही लक्ष वेधले आहे.

Published On: 

Chitrapat Mahamandal Election: उदय सामंत यांचा संताप!

राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, पण आता या राजकीय आखाड्याची धग थेट मनोरंजन विश्वापर्यंत पोहोचली आहे. तब्बल दहा वर्षांनंतर होत असलेल्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत (Chitrapat Mahamandal Election) सध्या हाय-व्होल्टेज ड्रामा सुरू आहे.

या निवडणुकीत चक्क राज्याचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि त्यांच्या पीएचा हस्तक्षेप असल्याचा आरोप झाल्याने एकच खळबळ उडाली होती. पण आता खुद्द सामंत यांनीच यावर मौन सोडत एक मोठा बॉम्ब टाकलाय.

Uday Samant Chitrapat Mahamandal Election

“ज्यांना मी सहा महिन्यांपूर्वी मदत केली, तेच लोक आता माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत,” असा खळबळजनक खुलासा उदय सामंत यांनी केला आहे. या प्रकरणावरून संताप व्यक्त करत ते म्हणाले, “माझा या निवडणुकीशी काहीही संबंध नाही, विनाकारण माझी बदनामी करू नका. विधान परिषदेची निवडणूक झाल्यावर यामागचे ‘कर्ते-धर्ते’ कोण आहेत, हे मी नक्कीच समोर आणेन.”

हा संपूर्ण वाद पेटला तो अभिनेते विजय पाटकर यांच्या एका खळबळजनक दाव्यामुळे. पाटकर यांनी विद्यमान अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर जोरदार टीका करताना, ‘त्यांनी महामंडळाचं अक्षरशः थडगं केलंय’, असा घणाघात केला होता. एका मंत्र्याच्या दबावामुळे आपल्याला उमेदवारी अर्ज भरू दिला नसल्याचा गंभीर आरोप पाटकर यांनी केल्याने वातावरण चांगलंच तापलं.

यावर मेघराज राजेभोसले यांनीही जशास तसं उत्तर दिलंय. “विजय पाटकर हा इंडस्ट्रीला लागलेला कलंक आहे. अनुदानाच्या नावाखाली त्यांनी अनेकांना फसवलंय,” असा थेट पलटवार राजेभोसले यांनी केला. शिवाय, तुला अर्ज भरण्यापासून नेमक्या कोणत्या मंत्र्याने किंवा अधिकाऱ्याने रोखलं, त्याचं नाव जाहीर कर, असं खुलं आव्हानही त्यांनी दिल्याने आता निवडणुकीतील रंगत आणखीच वाढली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install