🕒 1 min read
बॉलिवूडमध्ये कधी कुणाचे ग्रह फिरतील आणि कोण रातोरात वादाच्या भोवऱ्यात अडकेल, हे सांगता येत नाही. आता थेट सुपरस्टार रणवीर सिंहवरच बॉलिवूडमध्ये (Ranveer Singh Ban) बंदी घालण्याची नामुष्की ओढवली आहे.
होय, तुम्ही बरोबर वाचलंत! फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) रणवीरवर असहकाराचा अस्त्र उगारलंय. फरहान अख्तरच्या ‘डॉन ३’ चित्रपटाच्या शूटिंगला अवघे काही दिवस उरले असताना रणवीरने अचानक काढता पाय घेतला.
Ranveer Singh Ban
संपूर्ण चित्रपटसृष्टीला आता त्याच्यासोबत काम न करण्याचे आदेश दिल्याने बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांनुसार, रणवीरला ‘डॉन’ची भूमिका अधिक आक्रमक आणि डार्क हवी होती. याच क्रिएटिव्ह मतभेदांमधून त्याने ऐनवेळी चित्रपट सोडला.
पण त्याचा हा निर्णय निर्मात्यांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. निर्मात्यांच्या दाव्यानुसार, आतापर्यंत प्री-प्रॉडक्शनवर तब्बल ४५ कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. शूटिंगसाठी अवघे तीन आठवडे उरलेले असताना हा निर्णय घेतल्याने २०० हून अधिक कर्मचाऱ्यांचे बुकिंग वाया गेले असल्याचं फेडरेशनचे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी स्पष्ट केलंय.
फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या तक्रारीनंतर FWICE ने मध्यस्थी करत रणवीरला आपली बाजू मांडण्यासाठी तीन वेळा बोलावले. पण त्याने कोणताही प्रतिसाद न दिल्याने थेट बंदीची कारवाई करण्यात आली. “कोणताही सुपरस्टार कायद्यापेक्षा मोठा नाही. जोपर्यंत तो आम्हाला भेटणार नाही, तोपर्यंत हा असहकाराचा आदेश कायम राहील,” असा सज्जड दम फेडरेशनचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी दिला आहे.
या सगळ्या वादानंतर रणवीरनेही मौन सोडलंय. व्यावसायिक चर्चा आणि वैयक्तिक संबंध परस्पर आदराने हाताळले जावेत, असं स्पष्ट करत त्याने या वादावर थेट भाष्य करणं टाळलंय. मात्र, रणवीरच्या या अचानक घेतलेल्या एक्झिटमुळे ‘डॉन ३’ चित्रपटाचं भवितव्य आता टांगणीला लागलंय.
📌 महत्वाच्या बातम्या
- लोकांकडून शिव्या……ट्रोलर्सनी सर्व मर्यादा ओलांडल्या; श्रेयस अय्यरच्या बहिणीचा संताप
- महाराष्ट्रात उन्हाचा तांडव; २४ तासांत तब्बल ११ जणांचा बळी, नेमकं काय घडतंय?
- उदय सामंत यांच्या पत्नीची मोठी माघार; निवडणुकीत अचानक ‘हा’ मोठा ट्विस्ट!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












