‘3 Idiots’चा ‘सायलेन्सर’ सोनम वांगचुकांच्या पाठीशी; म्हणाला, ‘त्यांना मरू द्यायचं नाही’

‘3 Idiots’मधील ‘चतुर रामलिंगम’ची भूमिका साकारणाऱ्या ओमी वैद्य यांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देत त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

Published On: 

दिल्ली : अभिनेता ओमी वैद्य (Omi Vaidya) याने ‘३ इडियट्स’ (3 Idiots) या चित्रपटात ‘चतुर रामलिंगम’ उर्फ ‘सायलेन्सर’ची भूमिका साकारली होती, ज्यासाठी त्याला चाहत्यांचं प्रचंड प्रेम मिळालं. अलीकडेच, ओमी वैद्य याने सामाजिक कार्यकर्ते आणि लडाखचे शिक्षण सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या उपोषणाला आपला पाठिंबा दर्शविला. दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करणारी एक भावूक पोस्ट त्याने शेअर केली.

व्हिडिओमध्ये ओमी वैद्य म्हणतो की, “मला फुन्सुक वांगडू यांना मरू द्यायचं नाहीये. हॅलो, ‘इडियट्स’ तुम्ही मला ओळखलंत का? मी ‘३ इडियट्स’मधील चतुर रामलिंगम आहे. आज मला तुमच्याशी एका गोष्टीबद्दल बोलायचं आहे. तुमच्यापैकी अनेकांना माहित आहे की, ‘३ इडियट्स’मधील ‘रँचो’ या पात्रामागील प्रेरणास्थान सोनम वांगचुक हे आहेत. त्यांनी शिक्षणासाठी अनेक वर्षे समर्पित केली असून, नवनिर्मिती आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी काम केलं आहे. आज त्यांना आपल्या पाठिंब्याची गरज आहे.”

सोनम वांगचुक यांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. त्यांच्या उपोषणाचा आज १७ वा दिवस आहे. त्यांची प्रकृती सातत्यानं खालावत चालली आहे. त्यांचे वजन सुमारे ८.५ किलोग्रॅमने घटले आहे.

आंदोलनाचं कारण काय?
सोनम वांगचुक २८ जून रोजी या आंदोलनात सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमधील कथित अनियमिततेमुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी हे आंदोलन केले जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही