🕒 1 min read
समाजात कधी कोण कुठल्या भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकेल सांगता येत नाही, याचाच धक्कादायक प्रत्यय नाशिकच्या अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणामुळे आला होता. आता याच बहुचर्चित आणि वादग्रस्त प्रकरणावर एक नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) एका अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. पण सध्या मनोरंजन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये ती एका वेगळ्याच चर्चेमुळे!
Ashok Kharat Movie
या आगामी चित्रपटात दीपाली सय्यद थेट राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची भूमिका साकारणार असल्याची दाट शक्यता आहे.
‘बिग बॉस’ (Bigg Boss Marathi) च्या घरातून बाहेर आल्यावरच आपल्याला या भोंदूबाबाच्या काळ्या कारनाम्यांची माहिती मिळाल्याचं दीपाली सय्यद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. नागरिकांना सतर्क करताना त्या म्हणाल्या, “अशा भोंदूबाबांपासून प्रत्येकाने सावध राहायला हवं. समाजात असे अनेक खरात आजही कुठे ना कुठे लपून बसले असतील.”
मात्र, चित्रपटातील आपल्या भूमिकेबाबत त्यांनी जाणीवपूर्वक सस्पेन्स कायम ठेवलाय. आपली भूमिका काय असेल हे थेट चित्रपटातच पाहायला मिळेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
सर्वाधिक चर्चा होतेय ती चाकणकरांवरील आरोपांबाबत. खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवरही काही आरोप झाले होते. यावर बोलताना दीपाली सय्यद यांनी राजकीय वास्तवावर बोट ठेवत अत्यंत सूचक विधान केलंय.
“राजकारणात काम करणाऱ्यांवर आरोप हे होतच असतात. पण या संपूर्ण प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा खरोखरच हात होता की नाही, हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच स्पष्ट होईल,” असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
या सूचक वक्तव्यामुळे राजकीय पडद्यामागच्या कोणत्या घडामोडी या चित्रपटातून उलगडणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवरुन उदय सामंत यांचा संताप; म्हणाले, ‘मी ज्यांना मदत केली त्यांनीच…’
- रणवीर सिंहवर बॉलिवूडमध्ये बंदी; ‘डॉन ३’ मधील ‘तो’ एक निर्णय पडला भलताच महागात!
- लोकांकडून शिव्या……ट्रोलर्सनी सर्व मर्यादा ओलांडल्या; श्रेयस अय्यरच्या बहिणीचा संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











