चाकणकरांच्या सांगण्यावरून तेजस्वी सातपुतेंनी खोटे गुन्हे दाखल केले; रुपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप

भोंदू खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या सांगण्यावरून एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा गंभीर आरोप रुपाली ठोंबरे यांनी केला आहे.

Published On: 

Rupali Thombre making allegations against Rupali Chakankar in Ashok Kharat case

पुणे, 17 नोव्हेंबर: नाशिकच्या कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी राज्याच्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह या प्रकरणातील एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. चाकणकरांच्या इशाऱ्यावरून सातपुते यांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचा दावा ठोंबरे यांनी केला आहे.

तेजस्वी सातपुते यांची पुण्यातील बदली झाल्यानंतर सात महिन्यांनी त्यांनी चाकणकरांच्या सांगण्यावरून एक खोटी तक्रार दाखल केली होती, असा आरोप ठोंबरे यांनी केला. ‘सातपुतेंच्या आतापर्यंतच्या सर्व बदल्या खरातच्या म्हणजेच स्वतःच्या माध्यमातून झाल्याचे रुपाली चाकणकर सांगायच्या,’ असेही त्या म्हणाल्या. खरात प्रकरणाबाबत एसआयटी प्रमुख म्हणून सातपुते यांची भेट घेऊन चाकणकरांवर कारवाईची मागणी केली होती; मात्र सातपुतेंनी शेवटपर्यंत गुन्हा दाखल केला नाही, उलट चाकणकरांवर टीका करणाऱ्यांवरच गुन्हे नोंदवण्यात आल्याचे ठोंबरे यांनी स्पष्ट केले.

चाकणकरांचे खरातसोबत केवळ फोटो आहेत म्हणून नव्हे, तर त्या खरातच्या ट्रस्टवर असल्यामुळेच आपण हे आरोप करत असल्याचे रुपाली ठोंबरे म्हणाल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, रुपाली चाकणकर, त्यांची बहीण आणि कुटुंबीयांच्या नावे पतसंस्थेमध्ये कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. तसेच, खरातच्या अनेक आर्थिक प्रकरणांमध्ये चाकणकरांची बहीण नॉमिनी आहे. एवढे सगळे पुरावे असूनही त्यांना आरोपी करण्यात आलेले नाही.

पदाचा गैरवापर करून चाकणकरांनी अनेक नेत्यांना आणि महिलांना अशोक खरातकडे नेल्याचा दावाही ठोंबरे यांनी केला आहे. आता याच राजकीय नेत्यांना ‘मला वाचवा, अन्यथा तुमचे फोटो व्हायरल करेन’ अशा धमक्या चाकणकरांकडून दिल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय खेमनार नावाच्या एका पत्रकारालाही त्यांनी माफी मागायला लावली असून, पोलिसांना हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार चाकणकरांकडून झाल्याचा आरोप रुपाली ठोंबरे-पाटील यांनी केला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही