रत्नागिरीत ACB ची मोठी कारवाई; पोर्ट क्लिअरन्सच्या लाचेप्रकरणी मेरीटाईम बोर्डाच्या ‘क्लास वन’ अधिकाऱ्याला बेड्या

परदेशी जहाजाला पोर्ट क्लिअरन्स देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी मेरीटाईम बोर्डाचे वर्ग-१ अधिकारी संदीप भुजबळ आणि एका खासगी व्यक्तीला रत्नागिरीत एसीबीने अटक केली.

Published On: 

ACB arrests Maritime Board officer Sandeep Bhujbal in Ratnagiri bribe case

रत्नागिरी, 17 नोव्हेंबर: परदेशी जहाजाला पोर्ट क्लिअरन्स आणि चाचण्यांची परवानगी देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रत्नागिरीत मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी (वर्ग-१) संदीप भुजबळ यांच्यासह एका खासगी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका परदेशी जहाजाला आवश्यक परवानग्या आणि प्रमाणपत्र देण्यासाठी संदीप भुजबळ यांनी तब्बल ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोड झाल्यानंतर हा व्यवहार ६० हजार रुपयांवर निश्चित झाला होता. यानंतर तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत अधिकृत तक्रार दाखल केली.

या तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने रत्नागिरीतील हॉटेल कार्निवल येथे सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मिलिंद बनप या खासगी पंटरला पथकाने रंगेहाथ पकडले.

मिलिंद बनप याला ताब्यात घेतल्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीनंतर मुख्य अधिकारी संदीप भुजबळ यांनाही एसीबीने बेड्या ठोकल्या. या धडक कारवाईमुळे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही