सोमवारी पहाटे अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात (NICU) भीषण आग लागली. व्हेंटिलेटरचा अचानक स्फोट झाल्यामुळे लागलेल्या या आगीत तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सहा बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
वाचवण्यात आलेल्यांपैकी काही बालकांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर जवळच्याच सुपर-स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट केले आहे की, दोषींवर नक्कीच कारवाई केली जाईल.
Chandrashekhar Bawankule on Amravati hospital fire
याप्रकरणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यामांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ही घटना चौकशीअंती पुढे येईल. पण तांत्रिक चुकांमुळे किंवा एखाद्या अग्निशामक व्यवस्थेमध्ये झालेल्या बिघाडामुळे किंवा चुकीमुळे जे काही घडले त्याचा रिपोर्ट येईल. त्यावर नंतर भाष्य करू. पण मला असे वाटते की अशा घटना पुन्हा या राज्यामध्ये किंवा अमरावतीमध्ये होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत.”
“अशा घटनावर राजकारण होऊ शकत नाही. गरीब-श्रीमंताचा इथे वाद नाही. तुम्ही अमरावतीच्या पालकमंत्री होत्या. तुम्ही हॉस्पिटलला पाहणी करण्याकरीता गेल्या होतात की राजकारण करण्याकरीता? तांत्रिक बाबी चुकीच्या असतील तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल. पोलीस कसुन चौकशी करत आहे.” असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.
पुढे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “मृत बालकांच्या नातेवाईकांच्या पाठीशी सरकार उभे आहे. सरकार व प्रशासन संपूर्ण मदत करत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या आहेत. प्रशासन पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली.”
“जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (NICU) सोमवारी पहाटे लागलेल्या आगीत उपचार घेत असलेल्या तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला.
काही नवजात बालकांना पुढील उपचारांसाठी विभागीय संदर्भ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यापैकी चौघांवर सध्या उपचार सुरू आहेत आणि एकाची प्रकृती चिंताजनक आहे. आग लागताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी इतर बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी तातडीने पावले उचलली.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. NICU मध्ये अकाली जन्मलेली, कमी वजनाची आणि गंभीररीत्या आजारी असलेल्या नवजात बालकांवर उपचार केले जातात. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून, मी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो.
📌 महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगेंचा इशारा अन् सरकारची शिष्टाई; अंतरवाली सराटीत आज मोठी चर्चा
- ‘उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते’; असीम सरोदे यांचे मोठे विधान
- ‘अंडी फेकत असाल तर ईद येतेय लक्षात ठेवा’; गणेश मिरवणुकीवरून नितेश राणेंचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











