Share

“कपिल सिबलांचे आरोप बिनबुडाचे”; शिवसेना प्रकरणावर नार्वेकरांचा पलटवार

Shivsena Case मध्ये कपिल सिबल यांच्या आरोपांवर राहुल नार्वेकर यांनी प्रत्युत्तर देत दावे बिनबुडाचे असल्याचे म्हटले.

Published On: 

Rahul Narwekar Kapil Sibal Shivsena case

सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह यासंदर्भात सुनावणी सुरू आहे. शिवसेना (ठाकरे गट) यांच्या वतीने कपिल सिबल (Kapil Sibal) हे बाजू मांडत आहेत. आजच्या सुनावणीदरम्यान, सिबल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या निर्णयावर आक्षेप घेत, नार्वेकर यांनी आपल्या अधिकारांच्या कक्षा ओलांडल्याचे म्हटले. दरम्यान, नार्वेकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना सिबल यांचे दावे बिनबुडाचे असल्याची टीका केली. यवतमाळ येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे भाष्य केले.

राहुल नार्वेकर नेमके काय म्हणाले?

कपिल सिबल हे त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहे, ते काय म्हणतात याच्यातून काही सिद्ध होत नाही. मी जी भूमिका घेतली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे. सुप्रीम कोर्टाने जे निकष दिले, त्या निकषाच्या आत राहून, त्या आधारावरतीच हा निर्णय दिला दिल्याचे नार्वेकर म्हणाले.

Rahul Narwekar Kapil Sibal Shivsena case

पुढे नार्वेकर म्हणाले की, “त्यांचे जे वकिल असतील त्यांच्या संदर्भात ते युक्तिवाद करतील, याचा अर्थ असा नाही की ते जे म्हणताय ते सत्य आहे. अध्यक्षांनी काय ठरवलं हे त्यांना कसं समजलं पहिला प्रश्न हा आहे असे नार्वेकर म्हणाले. असे बिनबुडाचे आरोप करुन कोणताही फरक पडत नाही, मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय असल्याचे नार्वेकर म्हणाले. या निर्णयामध्ये कोणताही बदल होईल असं मला वाटत नाही असेही ते म्हणाले.

सिबल यांचा न्यायालयात जोरदार युक्तीवाद

गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि संबंधित पक्षचिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे. ठाकरे यांचे वकील कपिल सिबल आपल्या पक्षकाराच्या बाजूने जोरदार युक्तिवाद करत आहेत. आज त्यांनी राहुल नार्वेकर यांनी घेतलेल्या निर्णयावर आक्षेप नोंदवताना पाहिले गेले.

युक्तीवादावेळी बोलताना कपिल सिबल म्हणाले की, राहुल नार्वेकरांना काय निर्णय घ्यायचा आहे हे माहित होते. मग त्या विशिष्ट निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी काहीतरी गुंतागुंतीचा तर्क मांडला. ‘व्हिप’ (पक्ष-आदेश) आमच्याकडे होता. आम्ही ‘व्हिप’ जारी केला होता की तुम्ही विधानसभा अध्यक्षांची निवड करू शकत नाही.”

“त्यांनी त्या ‘व्हिप’च्या विरोधात मतदान केले. अध्यक्षांचे म्हणणे आहे की पक्षाच्या घटनेची तपासणी करणे आवश्यक आहे आणि ती 1999 ची घटना आहे. कारण निवडणूक आयोगाच्या (ECI) रेकॉर्डवर तीच घटना उपलब्ध आहे. या सर्व बाबींमध्ये लक्ष घालण्याचे अधिकार अध्यक्षांना कोठून मिळाले? असा सवालही कपिल सिबल यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही