Share

Manoj Jarange : 29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी मुंबईत परवानगीचा अर्ज; ‘गनिमी कावा’चा सस्पेन्स

मनोज जरांगे यांच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी मुंबईतील आझाद मैदानावर परवानगीचा अर्ज दाखल झाल्याची माहिती आहे.

Published On: 

Manoj Jarange Maratha Reservation protest

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आक्रमकपणे लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनासाठी ‘गनिमी कावा’ वापरण्याची घोषणा यापूर्वीच केली होती. आता या आंदोलनाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला २९ ऑगस्टपासून सुरू होणारे आंदोलन ‘अंतरवाली सराटी’ येथे होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, गनिमी कावा असेल याचा अंदाज बांधला जात होता.

Manoj Jarange Maratha Reservation protest

आता जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या परवानगीसाठी थेट मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात अर्ज दाखल करण्यात आला आहे. यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. २९ ऑगस्टचे मुख्य आंदोलन अंतरवाली सराटी येथे होणार की ते थेट मुंबईत होणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, अंतरवाली सराटीऐवजी राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत भव्य आंदोलन करण्यासाठी मराठा समाजाने जोरदार तयारी सुरू केली आहे.

विशेष म्हणजे, अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी प्रशासनाकडे अद्याप कोणतीही अधिकृत परवानगी मागण्यात आलेली नाही. याउलट, मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या अर्जामध्ये जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय गंगाधर काळकुटे आणि पांडुरंग तारख यांची नावे नमूद करण्यात आली आहेत. गंगाधर काळकुटे, ॲड. आशिष गायकवाड आणि त्यांचे सहकारी आवश्यक ती परवानगी मिळवण्यासाठी मुंबई पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत.

जरांगे पाटील यांनी ‘गनिमी काव्या’चे संकेत दिल्यानंतर मुंबईत अर्ज दाखल झाल्यामुळे राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाची चिंता वाढली आहे. जर हे आंदोलन खरोखरच मुंबईत धडकले, तर सरकार काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही