Share

Narendra Dabholkar Case: सचिन अंदुरेला मुंबई हायकोर्टाकडून जामीन; जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील दोषी सचिन अंदुरेला मुंबई हायकोर्टाने जामीन देत जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

Published On: 

Sachin Andure in Dabholkar case

Dabholkar Case : सामाजिक कार्यकर्ते आणि ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या हत्या प्रकरणात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील दोषी सचिन अंदुरे (Sachin Andure) याला जामीन मंजूर केला असून, त्याची जन्मठेपेची शिक्षाही स्थगित केली आहे.

न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. या प्रकरणातील सह-आरोपी शरद कळसकर याला यापूर्वीच एप्रिलमध्ये जामीन मिळाला आहे. आता मुख्य आरोपी सचिन अंदुरे यालाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. याआधी, पुराव्याअभावी वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

Sachin Andure in Dabholkar case

२०२४ मध्ये, सीबीआयच्या विशेष न्यायालयाने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या दोषी ठरवण्याच्या निर्णयाला आणि शिक्षेला आव्हान देणारी अपिले मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर, उच्च न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कळसकरला जामीन मंजूर केला. आता सचिन अंदुरे याचीही जामिनावर सुटका झाली आहे.

२० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात शिंदे पुलावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेले असताना डॉ. दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पुण्यातील विशेष न्यायालयात १५ सप्टेंबर २०२१ रोजी या खटल्याची सुनावणी सुरू झाली. या प्रकरणात पाच आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

या आरोपींमध्ये वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांचा समावेश होता. यापैकी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, तर वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही