Share

“पुण्याबाबत आमचा अंदाज चुकला”; वाहतूक कोंडीवर गडकरींची मोठी कबुली

नितीन गडकरी यांनी पुण्याच्या वाढत्या वाहतूक कोंडीवर बोलताना शहराच्या विकासाचा अंदाज चुकल्याची कबुली दिली.

Published On: 

Nitin Gadkari speaking about Pune traffic

पुणे : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) गेल्या काही महिन्यांपासून रस्ते आणि महामार्गांची स्थिती, नवीन प्रकल्प आणि इंधनाला पूरक पर्यायांमुळे चर्चेत आहेत. आता पुण्यात केलेल्या एका विधानामुळे ते पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. शहरातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी कबूल केले की, पुण्याच्या विकासाबाबतचा आमचा अंदाज चुकीचा ठरला होता. (Pune Traffic)

लवळे येथील सिम्बायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी) मध्ये आयोजित ‘फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स’ या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सिम्बायोसिसच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमन, वैद्यकीय विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. राजीव येरवडेकर आणि कुलसचिव डॉ. एम. एस. शेजुल उपस्थित होते.

Nitin Gadkari speaking about Pune traffic

यावेळी भाषण करताना नितीन गडकरी म्हणाले की, “पुण्यातील आजची भीषण वाहतूक कोंडी पाहता, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे बांधतानाच भविष्यातील वाहनांच्या संख्येचा आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करून तो आणखी मोठा बांधायला हवा होता. पुणे शहर इतक्या वेगाने वाढेल याचा आमचा अंदाजच चुकला, त्यामुळे रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या नियोजनात कमतरता राहिली.” अशी कबुली त्यांनी दिली आहे.

“मी राज्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मुंबई-पुणे महामार्गाचे नियोजन सुरु होते. सुरुवातीला हा रस्ता चार पदरी (4-Lane) करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, मी भविष्यातील गरजा लक्षात घेऊन तो सहा पदरी (6-Lane) करण्याचा आग्रह धरला आणि तो बांधला. परंतु, आजच्या घडीला हा ६ पदरी मार्गही वाहनांच्या तुलनेत अपुरा पडत आहे, अशी त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

“वाढते हवेचे प्रदूषण आणि वाहतूक कोंडीच्या समस्या असूनही पुण्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या रोज वाढत आहे. पुणे आता पूर्णपणे ‘हाऊसफुल्ल’ झाले आहे. त्यामुळे आताच्या वाहतूक समस्यांवर तात्पुरते मलमपट्टी सदृश उपाय शोधण्याऐवजी, पुढील २५-५० वर्षांचा दीर्घकालीन विचार करूनच पायाभूत सुविधांचे नियोजन करणे काळाची गरज आहे.” असेही नितीन गडकरी म्हणाले.

“चांगल्या पायाभूत सुविधांमुळे शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत पोहोचवणे सोपे होते, ग्रामीण भाग शहरांशी जोडला जाऊन रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतात.” असेही नितीन गडकरी यांनी यावेळी अधोरेखित केले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही