Sanjay Raut on CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी दिल्लीला जाण्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला. या अफवा फेटाळून लावताना त्यांची तुलना ‘पतंग किंवा फुगे हवेत सोडण्याशी’ करत त्यांनी विरोधकांना ठामपणे सांगितले की, कोणीही काहीही म्हटले तरी मी मात्र मुंबई आणि महाराष्ट्रातच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, यावर आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपले मत व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत जातील. यावेळी संजय राऊत प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊत यांनी म्हटले की, “जंतर मंतरच्या प्रकारानंतर त्यांना (पंतप्रधानांना) एक उत्तम कॅबिनेट बनवायचं आहे आणि त्यासाठी त्यांना देवेंद्र फडणवीसांची आवश्यकता आहे असे ते सांगतात, त्यांच्या सहकाऱ्यांना सांगतात आणि कालसुद्धा १०० टक्के त्यांनी देवेंद्रजींना सांगितले असणार, मग ते रिकामटेकडे आहेत का? असा सवाल त्यांनी केला.
Devendra Fadnavis and Sanjay Raut
“देवेंद्रजी हळूहळू इकडले काम आवरतील आणि दिल्लीत जातील. आवरावं लागतं ना घर, जेव्हा आपण ते बदलतो, आता महाराष्ट्रातून अनेक लोक दिल्लीला गेलेले आम्ही पाहिलेले आहेत, यशवंतराव चव्हाणांपासून, विलासराव देशमुख असतील, शंकरराव चव्हाण असतील, गोपीनाथराव मुंडे असतील, मग मूळ घर आवरावं लागतं, त्याला थोडा वेळ घ्यावा लागतो.” असे संजय राऊत म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “आपापल्या माणसांची सोय करावी लागते, कुटुंबाची व्यवस्था करावी लागते, पण देवेंद्रजींना राष्ट्र साद घालत आहे आणि ते जे म्हणतात मी इथेच राहणार, तुमचे खूप इच्छा आहे पण, तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला ढकलतात, त्याचं काय? तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्ही दिल्लीत जावे म्हणून देव पाण्यात घालून बसलेले आहेत, मी चांगल्या भावनेने बोलतोय, आमच्या सद्भावना आहेत.”
“आमच्या त्यांच्याविषयी सद्भावना आहेत की, महाराष्ट्रातल्या नेत्यांने राष्ट्राच नेतृत्व करावे, पण तुमच्यातील काहींच्या सद्भावना नाहीत, ते कधी एकदा दिल्लीत जात आहेत आणि कधी एकदा आम्ही त्यांच्या जागी बसतो, असे बरेच लोक आहेत.” असेही संजय राऊत म्हणाले.
जसे ते देवेंद्रजी प्रधानमंत्र्यांना भेटतात, तसे काही लोक अमित शाहांना भेटतात जाऊन सारखे, आता त्यांना तुम्ही दिल्लीत घेताय, यांच्यापेक्षा दिल्ली मला जास्त माहिती आहे, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.
“तारे तोडायचे, फुगे उडवायचे, पतंग उडवायची, त्याला ती उडवू द्या. कुणी काहीही म्हणत राहिले तरी मी मात्र मुंबई आणि महाराष्ट्रातच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
महाराष्ट्रातील विविध विकासकामे आणि महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी दिल्ली दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि भूपेंद्र यादव यांची भेट घेतली.
या भेटींनंतर त्यांनी पत्रकारांना दिल्ली दौऱ्याची माहिती दिली. यावेळी पत्रकारांनी फडणवीस यांना आपली दिल्लीत नियुक्ती होणार असल्याची चर्चा असल्याबाबत प्रश्न केला. यावर फडणवीस म्हणाले, “अनेक रिकामटेकडे लोक आहेत. त्यांना माझ्याबद्दल वेगवेगळी चर्चा करायला आवडते. त्यांना त्याचा आनंद घेऊ द्या.”
पुढे ते म्हणाले की, “महाराष्ट्राच्या जनतेसह माझे नेते नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे. मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आणि करत राहीन. अनेक लोकांना वाटते की, मी दिल्लीत गेलो पाहिजे. पण त्या सगळ्यांना सांगतो की, मी मुंबई आणि महाराष्ट्रातच आहे.”
📌 महत्वाच्या बातम्या
- “विधानसभा अध्यक्षांनी दहाव्या अनुसूचीची रचनाच उद्ध्वस्त केली”; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
- Manoj Jarange : 29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी मुंबईत परवानगीचा अर्ज; ‘गनिमी कावा’चा सस्पेन्स
- “सोनिया गांधींची चाटूगिरी करताना न्यायालयाचा विसर?”; चित्रा वाघांचा वडेट्टीवारांवर घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











