Share

६ ऑक्टोबरला एकाच वेळी २ भारतीय संघ मैदानात! वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार सामने

६ ऑक्टोबरला भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला टी-२० सामना, तर भारत ‘अ’ संघ ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे.

Published On: 

Team India playing two matches on the same day

प्रतिनिधी, 5 ऑक्टोबर: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ६ ऑक्टोबर हा दिवस विशेष असणार आहे. या दिवशी दोन भारतीय संघ एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी मैदानात उतरणार आहेत. एकीकडे भारताचा मुख्य संघ वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळेल, तर दुसरीकडे भारत ‘अ’ संघ ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध एकदिवसीय मालिकेत भिडणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना लखनौच्या एकाना स्टेडियमवर रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७ वाजता हा सामना सुरू होईल. यापूर्वी झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर २-१ असा विजय मिळवला आहे.

दुसरीकडे, पुदुचेरीमध्ये दुपारी २ वाजता भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतून हार्दिक पांड्या पुनरागमन करणार होता. मात्र, दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागल्याने त्याच्या जागी सूर्यांश शेडगेला संधी देण्यात आली आहे. यापूर्वी भारत ‘अ’ संघाने ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्धची दोन सामन्यांची अनधिकृत कसोटी मालिका १-० ने जिंकली आहे. आता ही एकदिवसीय मालिका ६ ते ११ ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाईल.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात श्रेयस अय्यर, वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा, नमन धीर, अभिषेक शर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, ईशान किशन, संजू सॅमसन, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मयंक यादव यांचा समावेश करण्यात आला आहे.

तसेच ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध खेळणाऱ्या भारत ‘अ’ च्या एकदिवसीय संघात ऋतुराज गायकवाड, प्रियांश आर्य, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, सूर्यांश शेडगे, निशांत सिंधू, अर्शिन कुलकर्णी, विप्रज निगम, अर्शद खान, कुमार कुशाग्र, प्रभसिमरन सिंग, यश ठाकूर आणि गुरजापनीत सिंग यांना स्थान मिळाले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

६ ऑक्टोबर रोजी भारताचा मुख्य संघ वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळणार आहे, तर भारत ‘अ’ संघ ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध एकदिवसीय सामना खेळणार आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही