प्रतिनिधी, 5 ऑक्टोबर: आगामी २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघाची (Team India) तयारी आतापासूनच सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी या स्पर्धेसाठी भारताच्या संभाव्य संघातील पहिल्या सहा फलंदाजांची निवड केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी या यादीतून ऋषभ पंतला वगळले असून, केएल राहुलला यष्टीरक्षणासाठी पहिली पसंती दिली आहे. तर इशान किशनचा राखीव पर्याय म्हणून विचार होऊ शकतो, असे त्यांचे मत आहे.
आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा यांनी स्पष्ट केले की, २०२३ आणि २०२७ च्या विश्वचषकातील भारताच्या आघाडीच्या फळीत फारसा बदल दिसणार नाही. रोहित शर्मा आणि शुभमन गिल हेच डावाची सुरुवात करतील, तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजीला येईल. या तिन्ही फलंदाजांकडे अनुभवासोबतच मोठ्या सामन्यांमध्ये कामगिरी करण्याची क्षमता आहे. विशेष म्हणजे, २०२६ मधील एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये रोहित, विराट आणि गिल यांचा समावेश असून यात गिल आघाडीवर असल्याचे त्यांनी नमूद केले.
चौथ्या क्रमांकाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवली जावी, असे चोप्रांचे म्हणणे आहे. व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये तो जगातील सर्वोत्तम मधल्या फळीतील फलंदाजांपैकी एक असून, चौथ्या क्रमांकावर त्याने ४७ पेक्षा जास्त सरासरीने दोन हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. तर पाचव्या क्रमांकावर भारताचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक म्हणून केएल राहुलला स्थान देण्यात आले आहे. पाचव्या क्रमांकावर राहुलची सरासरी तब्बल ६८.५८ इतकी असून त्याने चार शतके आणि दहा अर्धशतके झळकावली आहेत.
सहाव्या क्रमांकासाठी हार्दिक पांड्याला पसंती देण्यात आली आहे. दुखापतीमुळे हार्दिक सध्या क्रिकेटपासून दूर असून त्याने आयपीएल २०२६ नंतर कोणताही सामना खेळलेला नाही. आगामी न्यूझीलंड मालिकेतील त्याच्या सहभागावरही प्रश्नचिन्ह आहे. मात्र, चोप्रा यांनी हार्दिकच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. हार्दिकला कधीही खराब फॉर्ममध्ये पाहिले नसल्याचे सांगत, तो फिट असल्यास २०२७ च्या विश्वचषकात सहाव्या क्रमांकासाठी महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो, असे ते (Aakash Chopra) म्हणाले.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘ब्रिटिशांसारखा भाजपचाही मेंदू हललाय’; फडणवीसांच्या ‘गजनी’ टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर
- पोलिसांची धडक कारवाई: वाळू व मुरुमाची अवैध वाहतूक करणारी ३ वाहने जप्त; ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
- वाळूमाफियांचा सुळसुळाट! गुन्हे शाखेचा छापा अन् २७ लाखांचा मुद्देमाल जप्त; सपोनि भरत मोरे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
Quick Answers
आकाश चोप्रा यांच्या मते, रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे डावाची सुरुवात करतील, तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजीला येईल.
आकाश चोप्रा यांनी ऋषभ पंतला वगळले असून, केएल राहुलला पाचव्या क्रमांकावर यष्टीरक्षणासाठी पहिली पसंती दिली आहे. तसेच इशान किशनचा राखीव पर्याय म्हणून विचार होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
चोप्रा यांच्या म्हणण्यानुसार, चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरने ४७ पेक्षा जास्त सरासरीने दोन हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.
सहाव्या क्रमांकासाठी आकाश चोप्रा यांनी हार्दिक पांड्याला पसंती दिली असून, तो फिट असल्यास या क्रमांकासाठी महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो असे त्यांनी म्हटले आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








