मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय हालचाली आज वेग घेण्याची शक्यता आहे. मंगळवारी होणार असलेली मंत्रिमंडळाची बैठक आजच घेण्याचा अनपेक्षित निर्णय घेतल्यामुळे असे घडत आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी संपूर्ण मंत्रिमंडळासाठी डिनर आयोजन केले आहे. या डिनरपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात बैठक होणार आहे. त्यानंतर सर्व मंत्रिमंडळ सदस्यांशी चर्चा केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
Fadnavis Shinde Sunetra Pawar meeting
मुंबईबाहेर एका धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नियोजनामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीची वेळ बदलण्यात आली. मात्र, त्यानंतर ‘वर्षा’ निवासस्थानी ‘महायुती’च्या प्रमुख नेत्यांची होणारी बैठक यामुळे विविध तर्कवितर्क आणि चर्चांना उधाण आले आहे.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर महायुतीसाठी ‘डिनर डिप्लोमसी’
आज दुपारी मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर महायुतीतील राज्याचे प्रमुख नेते ‘वर्षा’ निवासस्थानी भेट देणार आहेत. युतीमधील तीन पक्षांमध्ये अधिक समन्वय साधणे हा या बैठकीचा उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबतच महायुतीमधील तिन्ही पक्षांचे मंत्री आणि नेते ‘वर्षा’ येथे उपस्थित राहतील.
या बैठकीत युतीमधील भागीदारांमधील अंतर्गत मतभेद, विविध नेत्यांच्या तक्रारी आणि सरकारच्या कामाला गती देण्याचे उपाय यांवर चर्चा केली जाईल, असे समजते.
📌 महत्वाच्या बातम्या
- Amravati Hospital Fire: NICUला भीषण आग; 3 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू
- कंगनाचा तापसी पन्नूवर थेट निशाणा; आई-वडिलांना वादात ओढत विचारला संतापजनक सवाल
- भुलेश्वरच्या राजाच्या दुर्घटनेला खड्डे जबाबदार की दुसरंच काही? अग्निशमन दलाच्या माहितीतून मोठा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











