Share

Facebook Down: अचानक फेसबुक अकाऊंट्स का झाली बंद? जगभरात गोंधळ

फेसबुकची सेवा जगभरात अचानक ठप्प झाली आहे. डेस्कटॉप व्हर्जन बंद असून हजारो युजर्सना अकाऊंट ॲक्सेस करण्यात अडचणी येत आहेत.

Published On: 

Facebook Down error message on screen showing account temporarily unavailable

दिल्ली (Facebook Down) – रविवारी सुट्टीच्या दिवशी तुम्ही निवांत फेसबुक स्क्रोल करत होता आणि अचानक तुमचं अकाऊंट बंद पडलं? घाबरू नका, तुमचं अकाऊंट हॅक झालेलं नाही.

सध्या जगभरात फेसबुकची सेवा ठप्प झाली आहे. हजारो युजर्सना अचानक ‘अकाऊंट तात्पुरते अनुपलब्ध’ (Account Temporarily Unavailable) असा एरर मेसेज स्क्रीनवर दिसत आहे आणि त्यांना सक्तीने लॉग आऊट केले जात आहे.

फेसबुक डाऊन: मेसेंजर सेवाही कोलमडली

‘डाऊनडिटेक्टर’ (Downdetector) या वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, रविवारी सकाळपासून तक्रारींचा आकडा वेगाने वाढला. अवघ्या काही क्षणांतच ३,५५५ हून अधिक युजर्सनी फेसबुक चालत नसल्याचे रिपोर्ट केले. फेसबुकचे डेस्कटॉप व्हर्जन पूर्णपणे बंद आहे. त्यामुळेच युजर्सना फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करणे आणि मेसेंजरवरून मेसेज पाठवणे अशक्य झाले आहे.

‘साईटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अकाऊंट चालत नाही, थोड्या वेळाने प्रयत्न करा’, असा मेसेज युजर्सना दाखवला जात आहे. मात्र, या मोठ्या गोंधळामागे नेमकं कारण काय, याबाबत ‘मेटा’कडून (Meta) अजून कोणतीही अधिकृत पुष्टी देण्यात आलेली नाही. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही