Share

‘मोठी लढाई लढू, मातीसाठी रं गड्या…’; तेजस्विनी पंडितची ‘ती’ पोस्ट चर्चेत, राज ठाकरेंना दिला उघड पाठिंबा!

‘मोठी लढाई लढू, मातीसाठी रं गड्या…’ म्हणत अभिनेत्री तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंना पाठिंबा दर्शवला आहे. मतदानाच्या दिवशी तिची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Published On: 

Tejaswini Pandit Post: राज ठाकरेंसाठी शेअर केली खास पोस्ट

मतदानाला सुरुवात झाली असतानाच राजकीय वातावरण कसं तापलंय हे आपण पाहतोय. पण या रणधुमाळीत एका मराठमोळ्या अभिनेत्रीने थेट आपली भूमिका मांडली आहे. नेहमी आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) आता कोणाच्या बाजूने कौल दिलाय? तिची लेटेस्ट पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवून देत आहे.

Tejaswini Pandit Post viral 

आज (१५ जानेवारी) राज्यभरात २९ महापालिकांसाठी मतदान सुरू असताना, तेजस्विनीने इन्स्टाग्रामवर थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा फोटो शेअर करत त्यांना उघड पाठिंबा दर्शवला आहे. तिने कॅप्शनमध्ये एका गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत ज्या सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. ती लिहिते, “मोठी लढाई लढू… मातीसाठी रं गड्या… मनगटाचा जोर लावून… तू आभाळ आभाळ, वादळ तुझं… तू राजा आसमानीचं बळ दावजी…” या शब्दांतून तिने राज ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.

अवघ्या काही तासांपूर्वीच तेजस्विनीने नागरिकांना “भ्रष्ट माणसाच्या हातात पालिका देऊ नका”, असं कळकळीचं आवाहन केलं होतं. “सतर्क राहा, सुज्ञ आणि सुशिक्षित उमेदवार निवडा,” असं ती म्हणाली होती आणि त्यानंतर लगेच आज तिने राज ठाकरेंचा फोटो शेअर केल्याने, तिचा इशारा कोणाकडे होता आणि तिचा पाठिंबा कोणाला आहे, हे आता स्पष्ट झालंय, अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.

यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने मराठी मतांचे विभाजन टळणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. ९ वर्षांच्या खंडानंतर होत असलेल्या या निवडणुकीत तेजस्विनीसारख्या तरुण आणि लोकप्रिय चेहऱ्याचा पाठिंबा मनसेला किती फायदेशीर ठरतो, हे निकालाच्या दिवशीच कळेल. सध्या मात्र तिची ही ‘मराठी बाण्याची’ पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही