Kerala Travel Guide | केरळचे सौंदर्य बघायचे असेल, तर ‘या’ ठिकाणांना नक्की द्या भेट

Kerala Travel Guide | टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये पर्यटकांसाठी अनेक आकर्षक ठिकाणं आहेत. विविधता आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेल्या आपल्या भारत देशातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी देश-विदेशातून लोक येतात. तुम्हाला पण जर भारतातील संस्कृती आणि विविधतेचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही भारतातील केरळ राज्याला भेट देऊ शकतात. केरळमध्ये तुम्हाला अनेक आकर्षक ठिकाणं बघायला मिळतील. त्याचबरोबर केरळमध्ये तुम्हाला भारतातील दक्षिणात्य संस्कृतीची ओळख होईल. त्यामुळे तुम्ही केरळला भेट देण्याची योजना आखत असाल, तर तुम्ही पुढील ठिकाणांना भेट देऊ शकतात.

मुन्नार

केरळमधील मुन्नार हे ठिकाण निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्हाला उंच-उंच पर्वत बघायला मिळतील. मुन्नार हे ठिकाण जोडप्यांचे आवडते हनिमून डेस्टिनेशन आहे. त्याचबरोबर या ठिकाणी फिरण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येतात.

वायनाड

केरळमधील वायनाड शहर आपल्या सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्हाला अनेक आश्चर्यचकित करणारे निसर्गाचे नजारे बघायला मिळतील. त्यामुळे तुम्ही जर केरळ फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट दिली पाहिजे.

कोवलम

तुम्ही केरळ फिरायला जाण्याची योजना आखत असाल, तर तुम्ही त्या योजनेमध्ये कोवलमचे नाव नक्कीच सामील केले पाहिजे. केरळमधील हे शहर सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी सूर्यास्त पाहण्यासाठी येतात. त्याचबरोबर हे ठिकाण आयुर्वेदिक बॉडी मसाजसाठी देखील प्रसिद्ध आहे.

कुमारकोम

कुमारकोम हे केरळमधील प्रमुख शहर आहे. या ठिकाणी तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर तुमची सुट्टी निवांत घालवू शकतात. त्याचबरोबर कुमारकोममध्ये तुम्ही अनेक वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकतात. या ठिकाणी तुम्हाला तुमची सुट्टी निवांत साजरी करता येईल.

महत्वाच्या बातम्या

Back to top button