Urfi Javed | “उर्फी की अंडरवेअर मे…” ; उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं

Urfi Javed | मुंबई: सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमी तिच्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असते. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Vagh) यांनी उर्फीच्या विरोधात पोलीस तक्रार केली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला होता. त्यानंतर उर्फीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून चित्रा वाघ यांना उत्तर दिले होते. आता पुन्हा एकदा उर्फीने ट्विटरवर पोस्ट करत चित्रा वाघ यांना डिवचलं आहे.

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांचा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उर्फीने ट्विट करून चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं आहे. तिने स्वतःच्या अंतर्वस्त्राचा उल्लेख करत चित्रा वाघ यांना ग्रेट म्हटलं आहे.

उर्फी ट्विट करत चित्रा वाघ यांना म्हणाली, “उर्फी की अंडरवेअर मे, छेद हे चित्रा ताई ग्रेट है.” इतकंच नव्हे तर तिने या कॅप्शन शेजारी तीन रेड हार्ट इमोजी देखील पोस्ट केले आहे. यापूर्वी तिने पोस्ट करत चित्रा वाघ यांना सासू म्हटले आहे. ती ट्विट करत म्हणाली होती, “मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू.”

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील शाब्दिक वाद वाढत चालला आहे. उर्फीच्या कपड्यांवरून चित्र वाघ यांनी तिच्यावर कारवाई करावी, म्हणून मुंबई पोलिसांकडे मागणी केली होती. या संदर्भात त्यांनी मुंबई पोलिसांना पत्र देखील पाठवलं होतं. उर्फी मला भेटली तर मी तिचं थोबाड फोडीन, असं वक्तव्यही चित्रा वाघ यांनी त्यावेळी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला सडेतोड उत्तर देत उर्फीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.