KL Rahul & Athiya Shetty | ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’, केएल राहुल आणि अथियाच्या संगीत सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

KL Rahul & Athiya Shetty | खंडाळा: भारतीय संघातील क्रिकेटपटू केएल राहुल (KL Rahul) आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आज लग्न बंधनात अडकणार आहेत. सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर हा लग्न सोहळा होणार आहे. या दोघांच्या लग्नाची तयारी पूर्ण झालेली असून रविवारी (22 जानेवारी) या दोघांचे संगीत पार पडले. त्यांच्या संगीत सोहळ्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोघांचे लग्नपूर्वीचे समारंभ देखील याच ठिकाणी साजरे करण्यात आले आहे. रविवारी या दोघांचा संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये माध्यमांना आतमध्ये जाण्याची परवानगी नसली तरी त्यांच्या संगीत नाईटचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये बंगल्याची सजावट बघायला मिळत आहे. त्याचबरोबर ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ या गाण्याचा आवाज येत आहे.

रविवारी दुपारी सुनील शेट्टी त्यांच्या खंडाळा येथील बंगल्यावर पोहोचले होते. तेव्हा माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “अथिया आणि राहुल या दोघांनाही मी तुमच्याकडे नक्की घेऊन येणार आहे. तेव्हा तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहे ते विचारा.”

दरम्यान, अथिया शेट्टी आणि केएल राहुल 2018 पासून एकमेकांना डेट करत आहे. दोघांनीही आपलं नातं जाहीरपणे स्वीकारल आहे. अथिया अनेकदा राहुलच्या मॅच बघण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असते. तर, दोघं सोशल मीडियावर सतत एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत असतात.

महत्वाच्या बातम्या