Share

Weather Forecast | उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टीचा इशारा, तर राज्यात ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

🕒 1 min readWeather Forecast | टीम महाराष्ट्र देशा: देशात वातावरणामध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहे. काही ठिकाणी थंडी (Cold) तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. येत्या काही दिवसांमध्ये उत्तर-पश्चिम भारतातील अनेक ठिकाणी पाऊस (Rain) पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर हिमालयाच्या काही भागात जोरदार बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात … Read more

Published On: 

🕒 1 min read

Weather Forecast | टीम महाराष्ट्र देशा: देशात वातावरणामध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहे. काही ठिकाणी थंडी (Cold) तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. येत्या काही दिवसांमध्ये उत्तर-पश्चिम भारतातील अनेक ठिकाणी पाऊस (Rain) पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर हिमालयाच्या काही भागात जोरदार बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 24 ते 26 जानेवारी दरम्यान डोंगराळ भागात हिमवृष्टी आणि मैदानी भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 24 ते 26 जानेवारी दरम्यान सक्रिय असलेले वेस्टर्न डिस्टर्बन्स हळूहळू पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिमालयीन भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 24 आणि 25 जानेवारी दरम्यान हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टीची शक्यता आहे. तर 25 आणि 26 जानेवारीला उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

राज्यात देखील सतत वातावरणात बदल होताना दिसत आहे. कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या बदलत्या वातावरणाचा जनसामान्यांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. तर या वातावरणामुळे शेतीतील पिकांना देखील धोका निर्माण झाला आहे. अशात 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान राज्यात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यात मराठवाडा आणि विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. तर या भागात 24 जानेवारी रोजी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. लडाख, जम्मू-काश्मीरमध्ये 24 जानेवारी रोजी बर्फवृष्टी होऊ शकते. त्याचबरोबर उत्तर राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Agriculture

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या