Share

LIC Job | नोकरीची सुवर्णसंधी! एलआयसीमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

LIC Job | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये एकीकडे बेरोजगारीबद्दल बोलले जात असताना, दुसरीकडे अनेक संस्था रोजगार संधी उपलब्ध करून देत आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एलआयसीच्या या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. एलआयसीच्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक … Read more

Published On: 

LIC Job | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये एकीकडे बेरोजगारीबद्दल बोलले जात असताना, दुसरीकडे अनेक संस्था रोजगार संधी उपलब्ध करून देत आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एलआयसीच्या या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. एलआयसीच्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार licindia.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 9394 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या रिक्त पदांमध्ये प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदाचा समावेश आहे. यासाठी पात्रताधारक उमेदवार 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

एलआयसीच्या या भरती प्रक्रियेच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी licindia.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. या भरती प्रक्रियेमध्ये वय वर्ष 21 ते वय वर्ष 30 पर्यंत असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. या पदांसाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 750 रुपये भरावे लागणार आहेत. तर, SC/ST श्रेणीतील उमेदवारांना शंभर रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे.

एलआयसी यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार 21 जानेवारी 2023 पासून ते 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या पदांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार licindia.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही